शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

चाकण,तळेगाव एमआयडीसीतील वाहतूक कोंडी सुटणार, लवकरच स्वतंत्र चौपदरी रस्ता होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 12:05 PM

गेल्या काही वर्षांत चाकण आणि तळेगाव एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

पुणे : चाकण आणि तळेगाव एमआयडीसीतील औद्योगिक वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली असून, आता ही समस्या लवकरच सुटणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक वाहतुकीसाठी नाशिक रोड ते जुना मुंबई महामार्ग जोडणारा सुमारे 45 किलो मीटरचा स्वतंत्र 4 पदरी रस्त्याचे काम हाती घेतले आहे. रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या 90 टक्के जागेचे भूसंपादन पूर्ण झाले असून, कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. 

गेल्या काही वर्षांत चाकण आणि तळेगाव एमआयडीसी क्षेत्रातील औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या तुलनेत अपेक्षित तेवढ्या सोयीसुविधा मात्र निर्माण झाल्या नाहीत. याचा परिणाम आता संपूर्ण पुणे नाशिक महामार्ग व तळेगाव, मुंबई महामार्गावरील सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर परिणाम होत असून, प्रचंड वाहतूक कोंडी ही मोठी समस्या झाली आहे. याचा सर्वाधिक फटका चाकण चौक, तळेगाव चौक येथील लोकांना बसत आहे. त्यात आता चाकण टप्पा पाच व तळेगाव मध्ये मोठ्या प्रमाणात नव्याने गुंतवणूक होत असून, भविष्यात औद्योगिक वाहतूक गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर पुणे  एमआयडीसीच्या वतीने औद्योगिक वाहतुकीसाठी हा स्वतंत्र 4 पदरी रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. यामध्ये चाकण टप्पा पाच मधील रोहकळ गावात काही प्रमाणात भूसंपादन शिल्लक असून, हा विषय देखील लवकरच सुटेल, अशी माहिती एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी दिली. ---------येत्या दोन-तीन वर्षांत चाकण आणि तळेगाव एमआयडीसी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नवीन गुंतवणूक येणार आहे. सध्या सुरू असलेल्या कंपन्यांच्या दुपट्ट प्रमाणात नव्याने येणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढलेली असेल. या सर्व गोष्टींचा विचार करून, पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यात येत आहे.        - अविनाश हदगल, एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणTalegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसMIDCएमआयडीसीhighwayमहामार्ग