महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत; मुंबईत पत्रकार परिषदेत उपस्थित
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 18:36 IST2023-07-03T17:16:25+5:302023-07-03T18:36:46+5:30
रुपाली चाकणकर या शरद पवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अजित पवारांसोबत; मुंबईत पत्रकार परिषदेत उपस्थित
पुणे: राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. त्यांच्यासोबत आलेल्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील, धर्मरावबाबा आत्राम यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे दिली आहेत. राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते शरद पवारांसोबत राहणार असल्याचे सांगत आहेत. तर काहींनी अजितदादांना पाठिंबा दर्शवला आहे. अशातच महिला अयोभागाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अजित पवारांना पाठिंबा दिल्याचे समोर आले आहे.
रुपाली चाकणकर या शरद पवार यांच्या समर्थक म्हणून ओळखल्या जातात. रुपाली चाकणकर यांनी मुंबईतील देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेऊन 15 ते 20 मिनिटे चर्चा सकाळी केली होती. त्यानंतर चाकणकर यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु आता मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांच्या मागे रुपाली चाकणकर बसलेल्या दिसून आल्या आहेत.