शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटप्रेमींचं सेलिब्रेशन हुकलं!

By admin | Updated: March 27, 2015 00:24 IST

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमींची निराशा झाली.

पुणे : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात आल्यामुळे पुण्यातील क्रिकेटप्रेमींची निराशा झाली. आॅस्ट्रेलियाविरुद्धची लढत जिंकून गुरुवारी भारत अंतिम फेरी गाठेल, अशी आशा पुणेकरांना होती. अनेकांनी हा विजय सेलिब्रेट करण्याची तयारीही केली होती. मात्र, प्रत्यक्षात आॅस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्याने पुणेकर निराश झाले होते. सकाळी साडेनऊला सामना सुरू झाल्यानंतर शहरातील वाहतुकीवर परिणाम जाणवला. नेहमी जाणवणारी वर्दळ कमी झाली होती. फर्ग्युसन रस्ता, जंगलीमहाराज रस्ता, टिळक रस्ता, कॅम्प परिसर आदी ठिकाणी दुपारी वाहतूक लक्षणीयरीत्या घटली होती. ‘भारत-आॅस्ट्रेलिया सामना असल्यामुळे आज नेहमीच्या तुलनेत निम्मा व्यवसाय झाला,’ असे फर्ग्युसन रस्ता, पुणे विद्यापीठ रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, टिळक रस्ता या परिसरातील स्टॉलधारक आणि व्यापाऱ्यांनी सांगितले. ‘क्रिकेट फिवर’च्या फिवरमुळे मार्केट यार्डातील आवक थोडीफार कमी झाली होती. खरेदीवर मात्र लक्षणीय परिणाम झाला. अनेक स्थानिक खरेदीदारांनी आज मार्केटकडे पाठ फिरवल्यामुळे नेहमीपेक्षा २० ते ३० टक्के विक्री कमी झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.पोलिसांनाही भारत ही लढत जिंकेल, असे वाटत होते. विश्वचषकात भारताने आपल्या पहिल्या लढतीत पाकिस्तानला नमवल्यानंतर पुणेकरांच्या उत्साहाला उधाण आले होते. या विजयाचा जल्लोष करण्यासाठी पुणेकर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूककोंडी झाली होती. या वेळीही तसे होऊ नये म्हणून पोलिसांनी जय्यत तयारी केली होती. मात्र, भारताला विजयाने हुलकावणी दिल्यामुळे अनेकांची निराशा झाली. अनेक नोकरदारांनी हा सामना बघण्यासाठी आॅफिसला दांडी मारली होती. मात्र, भारताच्या पराभवामुळे सुटी वाया गेल्याची भावना सुनील पाटील, गोरक्ष जोशी, विवेक काण्णव या आयटी क्षेत्रातील नोकरदारांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)