शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘सीडीआर’ लूटमारीला बसणार चाप

By admin | Updated: July 6, 2015 05:38 IST

विविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) तपास करण्याच्या नावाखाली मिळवून काही पोलीस अधिकारी स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत.

लक्ष्मण मोरे, पुणेविविध गुन्ह्यांच्या तपासादरम्यान आरोपींच्या मोबाईल्सचे कॉल डिटेल रिपोर्ट (सीडीआर) तपास करण्याच्या नावाखाली मिळवून काही पोलीस अधिकारी स्वत:च्या तुंबड्या भरत आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून चालविली जाणारी ही लूटमार रोखण्यासाठी सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोबाईल कंपन्यांकडून मिळवलेल्या सीडीआरचा अहवाल मागवला आहे. गुन्हेगार, घरफोडे, चोरटे, सोनसाखळी चोरटे, फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींच्या मोबाईल वापराची सविस्तर माहिती पोलिसांना गुन्ह्यांच्या तपासासाठी मोबाईल कंपन्यांकडून घेण्याची मुभा आहे. पोलीस ठाणी तसेच गुन्हे शाखेचे पोलीस गुन्हेगारांच्या मोबाईलचे सीडीआर नेहमी मागवत असतात. त्याच्याआधारे गुन्हेगारांचे कोणाकोणाशी बोलणे होते, त्यांच्या संपर्कात कोण कोण आहेत, याची माहिती मिळते. काही अधिकारी प्रामाणिकपणे सीडीआरचा वापर करून गुन्ह्यांचा तपास करतात. यासोबतच गुन्हेगारांसह काही संशयित, ‘विशेष’ व्यक्तींचे मोबाईल आयुक्तालयामध्ये ‘इंटरसेप्शन’ला लावले जातात. या सर्वांचे संभाषण संशयास्पद वाटल्यास पोलीस कारवाईही करतात. परंतु काही अधिकारी मात्र या सीडीआरचा वापर करून स्वत:चे खिसे गरम करण्याचे काम करीत आहेत. गुन्हेगार अथवा त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना लुबाडण्याचेही प्रकार घडत आहेत. (प्रतिनिधी)गुन्हे उघडकीस आणण्यास मदतमोबाईल सीडीआरचा वापर करून गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलेले आहे. सध्या तरी मानवी खबऱ्यांपेक्षा पोलिसांची भिस्त मोबाईल कॉल डिटेल्सवरच आहे. परंतु यामध्येही काही ‘पॉवरबाज’ अधिकाऱ्यांचीच सध्या चलती आहे. गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने तर तत्कालीन क्रमांक दोनच्या अतिवरिष्ठाच्या मोबाईलचेच सीडीआर काढल्याची चर्चा आयुक्तालयामध्ये आहे. नीलेश घायवळ टोळीच्या अमोल बधेचा खून करून गजा मारणे पसार झाल्यानंतरची ही घटना असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अतिवरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांवर निम्नस्तरीय अधिकारी सीडीआरच्या माध्यमातून लक्ष ठेवून असल्याचे समोर आले आहे.पोलीस ठाण्यांना अगर गुन्हे शाखेच्या पथकांना कोणाचा सीडीआर हवा असेल तर त्यासाठी टेक्निकल अ‍ॅनालिसीस विंग किंवा संबंधित विभागाच्या उपायुक्तांना पत्र दिले जाते. नोडल आॅफिसरमार्फत हा सीडीआर पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेला दिला जातो.