शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही तपासले, मोबाईल लोकेशन पाहिले, पोलिसांना ताम्हिणी घाटाचा संशय बळावला, गाडीसह मृतदेह दिसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:17 IST

पुण्‍याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्‍हयातील कोंडेथर गावांनतर घाट रस्त्यावर पहिल्‍याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्‍याचा अंदाज आहे

पिरंगुट : मुळशी तालुक्याची हद्द संपताच पुणे व रायगड जिल्ह्याच्या वेशीवर असलेल्या ताम्हिणी घाटा मध्ये एका थार गाडीचा अपघात झाला असून ही गाडी जवळपास 400 ते 500 फूट खोल दरी मध्ये जाऊन कोसळली असुन या अपघातामध्ये आतापर्यंत चार युवकांचा मृत्यू झाला आहे.

पुणे येथून कोकणामध्ये फिरण्यासाठी निघालेल्या सहा युवकांच्या थार गाडीचा अपघात होऊन ही गाडी ताम्हिणी घाटा मध्ये (जि. रायगड) जवळपास चारशे ते पाचशे फुट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली. या दुर्घनेमध्ये सहा ही युवकांचा मृत्यु झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. परंतु ड्रोनच्या शोध पथकास आत्तापर्यंत फक्त चारच मृतदेह दिसून आलेले आहेत. तर इतर युवकांचा शोध सुरु असून त्या चार युवकांचे मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरु आहेत.

पालकांनी दिली होती हरवल्याची तक्रार 

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सोमवारी (ता.१७) रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने कोकणात फिरण्यासाठी प्रथम शहाजी चव्हाण (वय-२२,रा. कोंढवे धावडे, पुणे) पुनित सुधारक शेट्टी, (वय-२०, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे), साहील साधु बोटे (वय-२४, रा. कोपरे गाव, उत्तमनगर, पुणे) श्री महादेव कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे), ओंकार सुनील कोळी (वय-१८, रा. कोपरे गाव, भैरवनाथ नगर, पुणे,) शिवा अरुण माने (वय-१९, रा. कोपरे गाव,भैरवनाथ नगर, पुणे) हे सर्व सहा युवक निघाले होते. परंतु दुसऱ्या दिवसापासून त्या सर्व युवकांचा कोणताही संपर्क त्यांच्या घरच्यांशी त्यांच्या मित्रांशी तसेच नातेवाकांशी झाला नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या त्या युवकांच्या पालकांनी या घटनेबाबत उत्तमनगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात

त्यानंतर मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करण्यास सुरुवात केली असता सीसीटीव्ही तसेच त्या युवकांच्या फोनच्या लोकेशन च्या माध्यमातून तपास करता ते ताम्हिणी घाट परिसरापर्यंत येऊन पोहचले. तेव्हा गुरुवारी (ता.२०) पोलिसांनी फोनच्या लोकेशन आधारे ताम्हिणी घाटामधील (जि. रायगड) अवघड वळणावर असलेल्या अपघात प्रवणग्रस्त ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांना खोल दरी मध्ये त्या युवकांची थार गाडी व चार युवकांचे मृतदेह त्यांना त्या ड्रोन च्या माध्यमातून  दिसून आले. परंतु ती गाडी व मृतदेह हे खुप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोध कार्य करणे हे खुपच कठीण झाले होते. तेव्हा यामध्ये माणगाव पोलिस, रायगड आपत्ती व्यवस्थापन, मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने हे शोध कार्य करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून हा अपघात सोमवारी (ता.१७) मध्यरात्रीच्या दरम्यान झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे हा अपघात रात्रीच्यावेळी झाल्याने तो कुणाच्याही लक्षात आला नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : CCTV, Location Tracked; Police Suspect Tamhini Ghat, Bodies Found with Car

Web Summary : Six youths' Thar crashed into Tamhini Ghat, Raigad. Four bodies found; search continues. Parents reported them missing after no contact. Police suspect driver lost control. Accident occurred Monday night.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातcarकारPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू