‘सीसीटीव्ही’मुळे ९0 गुन्हे उघडकीस

By Admin | Updated: January 23, 2017 02:41 IST2017-01-23T02:41:34+5:302017-01-23T02:41:34+5:30

पोलीस आयुक्तालयातील मॉनिटरिंग रुमद्वारे पोलिसांना पुरवण्यात आलेल्या ५00 सीसीटिव्ही फुटेजपैकी ९0 गुन्ह्यांचा तपास

'CCTV' exposes 90 crimes | ‘सीसीटीव्ही’मुळे ९0 गुन्हे उघडकीस

‘सीसीटीव्ही’मुळे ९0 गुन्हे उघडकीस

पुणे : पोलीस आयुक्तालयातील मॉनिटरिंग रुमद्वारे पोलिसांना पुरवण्यात आलेल्या ५00 सीसीटिव्ही फुटेजपैकी ९0 गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तब्बल ११२ गुन्हेगारांना गजाआड करीत पोलिसांनी २८ लाखांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.
शहरामध्ये साडेबाराशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले. त्यामधील ९६५ कॅमेरे स्थीर स्वरुपाचे असून २३१ फिरते कॅमेरे आहेत.
शहरातील संवेदनशील, गर्दीच्या ठिकाणी तसेच महत्वाचे चौक आणि रस्त्यांवर या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सीसीटीव्ही मॉनिटरींग रुमच्या माध्यमातून बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. येथून अपघात, चोरी, छेडछाड, गडबड गोंधळ यावर लक्ष ठेवले जाते. मॉनिटरींग रुममधील मोठ्या स्क्रिनवर तसेच संगणकांवर गडबड दिसताच संबंधित पोलीस ठाणे, नियंत्रण कक्षासह गस्तीवरील पोलिसांना माहिती कळवली जाते. (प्रतिनिधी)

Web Title: 'CCTV' exposes 90 crimes