‘ऑपरेशन सिंदूर'चे फोटो,व्हिडीओ डाऊनलोड करणे पडू शकते महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:57 IST2025-05-13T11:56:38+5:302025-05-13T11:57:51+5:30

- पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

Caution! Downloading photos, videos to learn about Operation Sindoor Cyber experts warn that Pakistan will wage cyber war against India | ‘ऑपरेशन सिंदूर'चे फोटो,व्हिडीओ डाऊनलोड करणे पडू शकते महागात

‘ऑपरेशन सिंदूर'चे फोटो,व्हिडीओ डाऊनलोड करणे पडू शकते महागात

पुणे :भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या संघर्षात दोन्ही देशांनी शस्त्रसंधी स्वीकारली असली तरी पाकिस्तानच्या ‘नापाक’ इराद्यांबद्दल सांगता येत नाही. सध्या भारत-पाकिस्तान मधल्या संघर्षाची स्थिती काय आहे? ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे? हे जाणून घेण्यासाठी भारतातील नेटिझन्स हल्ल्यांचे फोटो, व्हिडीओ, डाऊनलोड करून बघत असून, सोशल मीडियावरTasksche.exe, डान्स ऑफ द हिलरी.exe आणि ऑपरेशन सिंदूर इनसाइट्स.पीडीएफ अशा काही पेलोड्सदेखील शेअर झाल्या आहेत.

पण अशा पेलोड्स उघडल्या तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप्समधील डेटा हॅक होऊ शकतो. या माध्यमातून पाकिस्तान भारताविरुद्ध सायबर युद्ध छेडण्याचा प्रयत्न करू शकतो, असा इशारा सायबरतज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

पेलोड कसा पसरतो

पेलोड कायदेशीर फायलींच्या नावाखाली प्रसारित केला जात असल्याचे वृत्त आहे, विशेषतः व्हिडीओ किंवा कागदपत्रे. या फायली वारंवार .exe एक्सटेंशनसह येतात (उदा., tasksche.exe) आणि पहिल्या दृष्टिक्षेपात निरुपद्रवी दिसतात. एकदा क्लिक केल्यानंतर, ते डिव्हाइसवर कोड स्थापित करू शकतात, ज्यामुळे रिमोट ॲक्सेस आणि डेटा चोरी होऊ शकतो.
 
पेलोड काय करू शकते ? 
 

- बँकिंग क्रेडेन्शियल्स आणि पासवर्डसह संवेदनशील वैयक्तिक डेटा काढणे.
- सिस्टम फाइल्समध्ये अनधिकृत प्रवेश मिळवणे.
- संक्रमित डिव्हाइसेसचे रिमोट कंट्रोल सक्षम करणे.

सुरक्षिततेचे उपाय

- सेटिंग्ज- स्टोरेज- मीडिया ऑटो डाऊनलोड; ऑटो मीडिया डाऊनलोड बंद करावे.
- मजबूत पासवर्ड वापरावे.
-मल्टी फॅक्टर सत्यापन चालू करावे.
- संशयास्पद लिंक्सवर क्लिक करू नये.
- तुमच्या महत्त्वाच्या फाइल्सचा बॅकअप घ्यावे.
- केवळ अधिकृत आणि परवानाकृत सॉफ्टवेअर वापरावे.

आता सर्व भारतीयांना ‘ऑपरेशन सिंदूर’ काय आहे, हे जाणून घेण्याची इच्छा आहे. लोक व्हिडीओ किंवा फोटो डाऊनलोड करून बघत आहेत. सोशल मीडियावर काही पेलोड्स शेअर केल्याच्या बातम्या आहेत. जर तुम्ही हे पेलोड्स उघडले तर तुमच्या मोबाइल किंवा लॅपटॉप्समधील डेटा हॅक होऊ शकतो. यासाठी अनोळखी लोकांकडून आलेले पीडीएफ, फोटो किंवा व्हिडीओ ओपन करू नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा एखाद्या सेलिब्रिटीजचे डीपफेक व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात. त्यामुळे अशा व्हिडीओंना बळी पडू नका. - डॉ. रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ

Web Title: Caution! Downloading photos, videos to learn about Operation Sindoor Cyber experts warn that Pakistan will wage cyber war against India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.