इंदापूर बाजारपेठेतील इलेक्ट्रीकल दुकानातून साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 21:05 IST2021-03-15T21:04:40+5:302021-03-15T21:05:30+5:30

अज्ञात चोरटे चोरी करताना सीसीटीव्हीत कैद

Cash lamps worth Rs 25,650 including materials from electrical shop in Indapur market | इंदापूर बाजारपेठेतील इलेक्ट्रीकल दुकानातून साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास

इंदापूर बाजारपेठेतील इलेक्ट्रीकल दुकानातून साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास

ठळक मुद्देनागरीकांमध्ये पसरले घबराटीचे वातावरण पसरले

इंदापूर शहरातील मुख्य बाजारपेठीतील खडकपुरा येथील नामांकीत इलेक्ट्रिकल दुकानाच्या खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी दुकानातील साहित्यासहित २५ हजार ६५० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेमुळे बाजारपेठेतील व्यापार्‍यांसह परिसरातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. 

 याबाबतची फिर्याद किशोर विठ्ठल पवार.(वय ३८), रा.खडकपुरा इंदापूर, ता.इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीसांत दीली फिर्याद दिली आहे. 
फिर्यादीत म्हटले आहे की, इंदापूर शहर मुख्य बाजारपेठीतील खडकपुरा, जुनी स्टेट बँक या ठीकाणी फीर्यादी यांचे मालकीचे हर्ष इलेक्ट्राॅनिक्स दुकान आहे. १४ मार्चला रात्री ८ ते १५ मार्च सकाळी ७ वा.पर्यंत या वेळेत दुकाण बंद होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांचे दुकानातील खिडकीचे गज वाकवून आणि खिडकी तोडून  दुकानात प्रवेश केला. दुकानाच्या गल्यात ठेवलेले ८ हजार ६५० रूपये रोख रक्कम, २ हजार रूपयांची चिल्लर, काॅसमाॅस कंपनीची बॅटरी २ हजार ६००, सीसीटीव्ही संच १२ हजार इत्यादी चोरी झाल्याचे नमूद केले आहे.

 बाजारपेठेतील दुकानाची चोरी झाल्याने शहरातील व्यापारी,दुकानदार व परीसरातील नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. या घटनेचा पुढील तपास इंदापूर पोलीस करत आहेत.
 

Web Title: Cash lamps worth Rs 25,650 including materials from electrical shop in Indapur market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.