शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
6
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
7
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
9
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
10
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
11
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
12
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
13
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
14
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
15
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
16
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
17
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
18
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
19
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
20
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी

पुण्यात एफटीआयआयने साकारली 'कारगिल वॉर मेमोरिअल' ची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 12:49 PM

कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहे. त्याच धर्तीवर '' एफटीआयआय '' ने यंदा ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ची प्रतिकृती उभारली आहे.

ठळक मुद्दे येत्या २६ ऑगस्टपर्यंत ही प्रतिकृती पुणेकरांना पाहाण्यासाठी खुली राहणार

पुणे : कारगिल विजय दिवसाला २६ जुलै रोजी वीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्याची दखल घेत फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय)च्या गेटसमोर यंदाच्या वर्षी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ची प्रतिकृती उभारली आहे. उद्या (दि.२५) या प्रतिकृतीचे उद्घाटन सदर्न कमांडचे मेजर जनरल आर.व्ही सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. 

दरवर्षी स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिनी एफटीआयआय  प्रशासनाच्या वतीने विविध  प्रतिकृती साकारल्या जातात. आतापर्यंत अमृतसर जालियनवालाबाग हत्याकांड (स्वातंत्र्यदिन २०१६), अंदमान सेल्युलर जेल (प्रजासत्ताक दिन २०१७), दिल्ली इंडिया गेट वॉर मेमोरिअल वॉर (स्वातंत्र्य दिन २०१८), कन्याकुमारी स्वामी विवेकानंद रॉक मेमोरिअल (प्रजासत्ताक दिन २०१८), अहमदाबाद साबरमती आश्रम (स्वातंत्र्यदिन २०१८) आणि दिल्ली राज घाट (प्रजासत्ताक दिन २०१९) या प्रतिकृती साकार केल्या. वीस वर्षांपूर्वी २६ जुलै १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानसोबत झालेल्या कारगिल युद्धात विजय मिळवला होता. हा दिवस दरवर्षी विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.
साधारण दोन महिने चाललेलं कारगिल युद्ध हे साहस आणि शौर्याचं प्रतिक मानलं जातं. कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ द्रास परिसरात ‘कारगिल वॉर मेमोरिअल’ उभारले आहे. त्याची प्रतिकृती यंदा एफटीआयआयने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून साकाराली आहे. एफटीआयआयच्या कला दिग्दर्शन आणि डिझाईन निर्मिती विभागाचे सहाय्यक प्राध्यापक आशुतोष कविश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रतिकृती उभारण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले आहे. येत्या २६ ऑगस्टपर्यंत ही प्रतिकृती पुणेकरांना पाहाण्यासाठी खुली राहणार आहे. 

टॅग्स :Puneपुणेwarयुद्धKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनFTIIएफटीआयआयbhupendra kaintholaभूपेंद्र कँथोला