शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

सावधान..!  रस्ते '' रंगवणाऱ्यां '' कडून चार महिन्यात ३२ लाखांचा दंड वसूल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:15 PM

सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत.

ठळक मुद्देमहापालिका अधिका-यांकडून आचानक होऊ शकते आपल्या भागात कारवाई क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचा-यांना अस्वच्छता पसरविणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेशमहापालिकेच्या वतीने आता नियमितपणे अशी कारवाई करण्यात येणार

पुणे : गेल्या चार-पाच महिन्यांपासून महापालिकेकडून शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी घाण करणा-या, रस्त्यावर थुंकणे, लघवी करणे आणि कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई सुरु आहे. सार्वजनिक ठिकाणी लघवी करणा-यांकडून आणि थुंकीबहाद्दरांकडून तब्बल ३१ लाख ५१ हजार ३२१ रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. ही कारवाई केवळ स्वच्छ सर्वेक्षणापुरती मयार्दीत नसून, यापुढे कायमस्वरुपी करण्यात येणार आहे. महापालिकेचे अधिकारी अचानकपणे शहराच्या कोणत्याही भागात कारवाई करणार आहेत.    सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, थुंकणे, कचरा टाकणे, उघड्यावर लघवी करणे, शौच करणे या गोष्टी कायद्याने गुन्हा आहेत. यासाठी केंद्र शासनाने महापालिकेला हे गुन्हे करणा-यांना शिक्षा करण्याचे अधिकार दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी सर्व क्षेत्रिय कार्यालयाच्या कर्मचा-यांना अस्वच्छता पसरविणा-या नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला नोव्हेंबर-डिंसेबर मध्ये काही प्रमाणात कारवाई करण्यात आली. परंतु त्यानंतर १ जानेवारी २०१९ पासून संपूर्ण शहरामध्ये नियमितपणे कडक कारवाई सुरु ठेवली आहे. ----कारवाई आता नियमितपणेगेल्या चार-पाच महिन्यांपासून शहरामध्ये रस्त्यावर थुंकणे, लघवी करणे आणि कचरा टाकणा-यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने आता नियमितपणे अशी कारवाई करण्यात येणार आहे.- ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा विभाग.-----गेल्या चार-पाच महिन्यांत शहरामध्ये करण्यात आलेल्या कारवाईसार्वजनिक ठिकाणी थुंकणे : व्यक्ती १४०९ (१ लाख ८९ हजार ८४०), सार्वजनिक ठिकाणी लघवी करणे : व्यक्ती १४४ ( २५ हजार ७५५), सर्वाजनिक ठिकाणी कचार टाकणे :  व्यक्ती  १०४५५(२८ लाख ५५ हजार ४३१), एकूण : व्यक्ती १२०३३( ३१ लाख ५० हजार ३२१)

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका