नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत; दोघे भाऊ गंभीर जखमी, पाबे घाटातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 12:21 IST2026-03-24T12:20:56+5:302026-03-24T12:21:09+5:30

पाबे घाटातून जाताना खिंडीत घाट चढत असताना एका वळणावर गाडीचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये किमान १७० ते २०० फूट दरीमध्ये कोसळली

Car goes straight into valley after losing control; two brothers seriously injured, incident at Pabe Ghat | नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत; दोघे भाऊ गंभीर जखमी, पाबे घाटातील घटना

नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत; दोघे भाऊ गंभीर जखमी, पाबे घाटातील घटना

खडकवासला : वेल्हे तालुक्यातून पुण्याकडे येताना पाबे घाट चढत असताना एका तीव्र वळणावर कारचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातातकार दरीत कोसळून दोन तरुण भाऊ गंभीर जखमी झाले. सोमवारी (दि. २३) पहाटे अडीचच्या सुमारास ही घटना घडली. कार दरीत कोसळताना तीनशे फुटांवर एका झाडाला अडकली. कार भाड्याने घेण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी पुण्यात खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात कारचा चक्काचूर झाला.

शुभम सचिन अजेटराव (वय २५) आणि अमित सचिन अजेटराव (वय ३०, रा. संतोषनगर, कात्रज) हे रात्री उशिरा वेल्हेमधून पाबे खिंडी मार्गे पुण्याकडे येत होते. त्यांच्या बरोबर दुसऱ्या कारमध्ये दोन मित्र होते. सोमवारी पहाटे दोन वाजता पाबे घाटातून जाताना खिंडीत घाट चढत असताना एका वळणावर गाडीचे नियंत्रण सुटून गाडी खोल दरीमध्ये किमान १७० ते २०० फूट दरीमध्ये कोसळली. यामध्ये अमित सचिन अजेटराव हा गंभीर, तर शुभमही जखमी झाला आहे.

शुभम आणि अमितच्या मित्रांनी तत्काळ पोलिसांच्या डायल ११२ वर फोन करून घटनेची माहिती दिली. वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार आकाश पाटील आणि मयूर जगताप यांनी घटनास्थळी पोहोचून आपत्ती व्यवस्थापन पथकाला दिल्यानंतर तात्काळ रात्री अडीच वाजता पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाचे प्रमुख तानाजी भोसले, वैभव भोसले, गणेश सपकाळ, संदीप सोळस्कर, संजय चोरघे, संतोष जाधव यांनी दरीमध्ये उतरून जखमींना स्ट्रेचरच्या साहाय्याने दरीमधून वर काढले व पुढील उपचारासाठी पुण्यामध्ये खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.

Web Title : नियंत्रण खोने से कार घाटी में गिरी; दो भाई गंभीर रूप से घायल।

Web Summary : पाबे घाट के पास, नियंत्रण खोने के बाद एक कार दुर्घटना में दो भाई घायल हो गए। वाहन 300 फुट गहरी खाई में गिर गया, जो एक पेड़ पर रुका। बचाव दल ने उन्हें निकालकर पुणे के अस्पताल में पहुंचाया। दोनों का गंभीर चोटों का इलाज चल रहा है।

Web Title : Car plunges into valley after control loss; two brothers injured.

Web Summary : Near Pabe Ghat, a car accident injured two brothers after the driver lost control. The vehicle fell into a 300-foot ravine, stopping at a tree. Rescue teams extracted them, transporting them to a Pune hospital. Both are being treated for serious injuries.