Pune Accident: भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 15:52 IST2026-04-10T15:14:34+5:302026-04-10T15:52:37+5:30

चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

Car driven carelessly at high speed Woman hit hard, dies on the spot | Pune Accident: भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच अंत

Pune Accident: भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली कार; महिलेला जोरदार धडक, जागीच अंत

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील धायरी गावात एका भरधाव चारचाकी कारने दिलेल्या जोरदार धडकेत २७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास धायरी ते रायकर मळा रस्त्यावरील सम्राट स्टेशनरी शॉपसमोर घडली. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. परिसरातील वाढत्या वेगामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपाली मंगेश तारू (वय २७, रा. धायरी, पुणे) या रस्त्याने जात असताना हा भीषण अपघात झाला. आरोपी चालक साहिल हुसेन शेख (वय ४९, रा. रायकर मळा, धायरी) हा आपल्या ताब्यातील कार घेऊन जात होता. त्याने आपली कार अत्यंत भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून दीपाली यांना पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दीपाली यांना गंभीर दुखापत होऊन त्यातच त्यांचा अंत झाला.
या प्रकरणी मृत दीपाली यांचे नातेवाईक नीलेश दत्तात्रय तारू (वय ३७ ) यांनी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी चालक साहिल शेख याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रस्त्यावरील रहदारीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे गाडी चालवल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रस्ता विभागाचे साहाय्यक पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल भोस, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत आणि पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे धायरी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार एस. बी. वावरे करीत आहेत.

Web Title : पुणे हादसा: धायरी में तेज रफ्तार कार ने महिला को कुचला, मौत

Web Summary : पुणे के धायरी में तेज रफ्तार कार की टक्कर से 27 वर्षीय महिला की मौत हो गई। आरोपी ड्राइवर साहिल शेख गिरफ्तार। पुलिस मामले की जांच कर रही है। तेज गति के कारण स्थानीय लोगों में आक्रोश है।

Web Title : Pune Accident: Speeding Car Kills Woman in Dhayari

Web Summary : A 27-year-old woman died in Dhayari, Pune, after being hit by a speeding car. The driver, Sahil Sheikh, has been arrested. Police are investigating the fatal incident. The accident has caused outrage among local residents due to frequent speeding.