पुण्यातील कात्रज भागात कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 19:46 IST2023-04-16T19:45:57+5:302023-04-16T19:46:07+5:30
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

पुण्यातील कात्रज भागात कारने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली
धनकवडी : कात्रज मोरे बाग बस स्थानक परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका मोटारगाडीने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान दाखत गाडी बाजूला घेतल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने यात कोणाला काही दुखापत झाली नाही. मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार (प्रणव मुनोत, वय २५ वर्षे रा. लेक टाऊन सोसायटी,) आपल्या आई सोबत खडकवासला परिसरात सायंकाळी निघाले होते.
सातारा रस्ता राजीव गांधी प्राणी संग्रहालय चौकातून पुढे जात असतानाच चालक प्रणव यास मोटारीत काही तरी तांत्रिक बिघाड असल्याचे निदर्शनास आले. पुढील बोनेट मधून हि धूर येत असल्याचे लक्षात आले. त्याच दरम्यान बाजूने जाणाऱ्या प्रवाशाने गाडी पेट घेत असल्याचे सांगितले. प्रणव ने ताबडतोब आई सह बाहेर पडला, त्याच दरम्यान त्याने फायर ब्रिगेड ला संपर्क साधला, तर चौकाच कर्तव्य बजावत असलेले भारती विद्यापीठ वाहतूक शाखेचे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही मिनिटात आलेल्या कात्रजअग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.