Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 10:12 IST2025-03-07T10:11:22+5:302025-03-07T10:12:09+5:30

एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली असून ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे

Cancer hospital to be set up in Pune Information from Minister of State Madhuri Misal | Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

Madhuri Misal: पुण्यात उभारणार कॅन्सर हॉस्पिटल; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती

पुणे: कॅन्सरचे वाढते रुग्ण पाहता पुण्यात कॅन्सर हॉस्पिटल करण्यासाठी राज्य शासन विचाराधीन आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडे जागेची मागणीदेखील करण्यात आली आहे. ससून रुग्णालय ही त्यासाठी योग्य जागा आहे, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.

ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयात २ हजार ३५० पदे मंजूर आहेत. पण, त्यातील ७६९ पदे ही रिक्त आहेत. तसेच १५६ नर्सिंगची पदे रिक्त आहेत. म्हणजे वर्ग चारची ५० टक्के पद रिक्त आहेत. ही पदभरती टीसीएसद्वारा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने केली जाते. अनेक वेळा यापूर्वीदेखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला आहे. येत्या आठ दिवसांत यासाठी पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्यासाठी हालचाली केल्या जातील, तसेच वर्ग एकची ४४ आणि वर्ग दोनची ११० रिक्त पदे तत्काळ भरली जातील, अशी माहिती मिसाळ यांनी यावेळी दिली.

अर्थसंकल्पीय अधिवेशन दरम्यान विधानसभेत आमदार सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, शरद सोनवणे, भीमराव तापकीर आणि विक्रम पाचपुते यांनी ससून सर्वोपचार शासकीय रुग्णालयासंबंधित लक्षवेधी प्रश्न मांडला होता. त्यास उत्तर देताना वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, ससून रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव रुग्णालय आहे. जेथे पुणे, पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण महाराष्ट्रातून रुग्ण येत असतात. वर्षाला साडेपाच लाख बाह्यरुग्ण येथे येतात, तर पुणे शहरातील जवळपास साठ हजार रुग्ण येथे दाखल असतात. येथे १५५ खाटांचा आयसीयू आहे. मात्र, क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येथे येत असल्याने रुग्णालयांवर अधिकचा भार पडत आहे.

१२ कोटी ९४ लाख रुपयांची औषध खरेदी

ससून शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा होत असल्याची तक्रार होती. या पार्श्वभूमीवर नुकतेच १२ कोटी ९४ लाख रुपयांची औषध खरेदी येथे करण्यात आली आहे. तसेच उपकरणांचीदेखील खरेदी करण्यात आली, तर जिल्हा नियोजन समितीकडे आणखी औषध खरेदीची मागणी केली आहे.

Web Title: Cancer hospital to be set up in Pune Information from Minister of State Madhuri Misal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.