शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

कालवा समितीची बैठक दिवाळीनंतर : आचारसंहितेचा अडसर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:29 AM

 शेती आणि पिण्याच्या पाणी वाटपाचे नियोजन होणार

ठळक मुद्देबैठकीची निश्चित तारीख अजून नाही ठरली

पुणे : शेती आणि शहराच्या पाण्याचा ताळेबंद मांडणारी कालवा समितीची १५ आॅक्टोबरच्या दरम्यान होणारी बैठक आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही बैठक दिवाळीनंतर होणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. शेतीचे आवर्तन आणि शहरातील पिण्याच्या पाण्याचे नियोजन या बैठकीत होणार आहे. 

सप्टेंबर महिनाअखेरीस उपलब्ध असलेल्या धरणसाठ्याच्या आधारे पिण्याचे आणि शेतीच्या पाण्याचे आरक्षण केले जाते. दरवर्षी १५ ऑक्टोबरपर्यंत ही बैठक घेणे बंधनकारक असते. निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित तारीख अजून निश्चित झाली नसली तरी दिवाळीनंतरच्या आठवड्यात ही बैठक होऊ शकते. खडकवासला धरण साखळीतील टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणांतून पुणे शहरातील आणि लगतच्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांची उपयुक्त पाण्याची क्षमता २९.१४ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. यंदा पर्जन्यमान चांगले झाल्याने सोमवारअखेर (दि. १४) चारही धरणांत मिळून २७.९७ टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात २५.४४ टीएमसी पाणी धरणांत शिल्लक होता. गेल्या मॉन्सूनमधे सप्टेंबर महिन्यात पावसाने पाठ फिरविल्याने धरणात पाणीसाठा कमी होता. त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामीण-शहरी असा वाद झाला होता. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१७मध्ये पुणे शहराला मापदंडानुसार वार्षिक ८.१९ अब्ज घनफूट (दररोज ६३५ दशलक्ष लिटर) पाणी मंजूर केले आहे. कालवा सल्लागार समितीच्या ४ आॅक्टोबर २०१८ रोजी झालेल्या बैठकीत शहराला वार्षिक ११.५० टीएमसी (दररोज ८९२ दशलक्ष लिटर) पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सध्या महापालिका दररोज १३५० ते चौदाशे एमएलडी पाणी वापरते. हा पाणीवापर वार्षिक १७ ते साडेसतरा टीएमसी इतका आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने महापालिकेला लोकसंख्येसह पाण्याचा ताळेबंद सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीकडे पाहिले जात आहे........

प्रकल्पीय सिंचन क्षेत्रप्रकल्प नाव                                                         क्षेत्र हेक्टरमध्येखडकवासला (सणसर जोड कालव्यासह)              ६२,१४६जनाई शिरसाई उपसा सिंचन योजना                   १३,८३५टेमघर                                                                   १०००एकूण खडकवासला प्रणाली                                   ७६,९८१ .........आचारसंहितेमुळे कालवा समितीची ऑक्टोबर महिन्यात होणारी बैठक दिवाळीनंतर होईल. बैठकीची निश्चित तारीख अजून ठरली नाही. - विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीagricultureशेतीFarmerशेतकरी