शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर चालत्या बसमध्ये वार

By admin | Updated: January 10, 2015 00:40 IST

स्वारगेट ते अप्पर इंदिरानगर असा प्रवास करीत असताना एका महिलेवर चालत्या बसमध्ये तरुणांनी ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

पुणे : स्वारगेट ते अप्पर इंदिरानगर असा प्रवास करीत असताना एका महिलेवर चालत्या बसमध्ये तरुणांनी ब्लेडने वार केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. याची माहिती असूनही पीएमपीच्या वाहक आणि चालकाने रुग्णालयात दाखल करणे तसेच पोलिसांना माहिती कळवण्याऐवजी या महिलेला शेवटच्या थांब्यावर उतरवून दिले. ब्लेडच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तोळण दिलीप पवार (वय ३५, रा. इंदिरानगर) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पवार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास स्वारगेटहून अप्परला जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये बसल्या, त्या वेळी दोन तरुणही त्याच बसमधून प्रवास करीत होते. जागा नसल्यामुळे पवार उभ्या होत्या. मद्यधुंद अवस्थेतील हे दोन तरुण महिला प्रवाशांशी असभ्य वर्तन करीत होते. यातील एका महिलेने एका तरुणाला थोबाडीत मारली. चिडलेल्या दोघांनी विनाकारण पवार यांच्या छातीवर, पाठीवर आणि दंडावर ब्लेडने वार केले. गंभीर जखमी झालेल्या पवार यांच्या अंगामधून रक्तस्राव सुरू झाला होता. बस चालक आणि वाहकाने ही बस पोलीस ठाण्यात किंवा रुग्णालयात नेणे अपेक्षित असताना या दोघांनीही हलगर्जीपणा दाखवून पवार यांना अप्परच्या शेवटच्या बसथांब्यावर उतरवले. आरोपींनाही पकडून त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिले नाही. जखमी अवस्थेतील पवार कशा तरी घरी पोहोचल्या. (प्रतिनिधी)४दुसऱ्या दिवशी आपल्यावर झालेल्या हल्ल्याची तक्रार देण्यासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या पर्वती दर्शन चौकीमध्ये गेलेल्या पवार यांना पोलिसांच्या उदासीनतेचा अनुभव आला. पोलिसांनी त्यांची तक्रार घेण्याऐवजी ससून रुग्णालयातून जखमी असल्याचे प्रमाणपत्र घेऊन येण्यास फर्मावले. जखमी अवस्थेतील पवार तशाच ससूनला जाऊन प्रमाणपत्र घेऊन आल्या. त्यानंतर शुक्रवारी दुपारी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला.