शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बसने दुचाकीला धडक देत फरपटत नेले; जेवण करून सोबत घेऊन जाताना अपघात, वहिनीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 12:47 IST

अपघातात दीर गंभीर जखमी झाला असून त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे

मंचर: पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत कळंब बायपास चौकात भरधाव वेगातील बसणे मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. हा अपघात रात्री अकराच्या सुमारास झाला. रूपाली प्रणाल पडवळ (वय  28 रा. महाळुंगे पडवळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

महाळुंगे पडवळ येथील अक्षय हनुमंत पडवळ हा हॉटेल माऊली येथे जेवण करून त्याची वहिनी रूपाली पडवळ यांना सोबत घेऊन घरी निघाला होता. पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे गावच्या हद्दीत महामार्ग ओलांडून मोटरसायकल कळंबच्या दिशेने निघाली. यावेळी पुणे बाजूकडून बस वेगाने आली. या बसने मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन फरपटत नेले. या अपघातात मोटरसायकलवर मागे बसलेली रूपाली प्रणाल पडवळ या गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. तर चालक अक्षय हनुमंत पडवळ गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर बस चालक कुठलीही मदत न करता तेथून फरार झाला आहे.

दरम्यान पुणे नाशिक महामार्गावर कळंब बायपास सुरू होणाऱ्या व छेद रस्ता असणाऱ्या या भागात स्पीड ब्रेकर नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. येथे उड्डाणपूल करावा अथवा स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. प्रणित दौलत पडवळ याने फिर्याद दिल्यानंतर अज्ञात बस चालका विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक मोरे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरAccidentअपघातDeathमृत्यूWomenमहिलाbikeबाईकPoliceपोलिस