शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे पाणी पुन्हा पेटणार

By admin | Updated: June 13, 2014 04:58 IST

एकीकडे सक्तीने प्रदूषित पाणी घ्यावे लागत असतानाच दुसरीकडे पाण्याच्या हक्कावरही पाणी सोडावे लागत असल्याने उजनी बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतला

लोणी देवकर : एकीकडे सक्तीने प्रदूषित पाणी घ्यावे लागत असतानाच दुसरीकडे पाण्याच्या हक्कावरही पाणी सोडावे लागत असल्याने उजनी बचाव समितीने आक्रमक पवित्रा घेतला असून, दरवर्षीच्या या वादाला कंटाळून आता न्यायालयात जाण्याची भूमिका समितीने घेतली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी समितीच्या वतीने पळसदेव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी (दि. १५) बैठक बोलवण्यात आली आहे.याबाबत माहिती देताना, उजनी बचाव समितीचे सदस्य अनिल खोत म्हणाले, उजनी धरणावर कोणाचा किती हक्क आहे, हे ठरवण्यासाठी तसेच पाण्याचे योग्य वाटप होण्यासाठी, तसेच पाणी प्रदूषणाबाबत पुन्हा एकदा शासनाचे लक्ष वेधण्यासाठीही या बैठकीत चर्चा होणार आहे.सध्याच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने राज्य नदी संवर्धन योजना १ मार्च २०१४ रोजी तयार केली. मात्र यामध्येही उजनी धरणाच्या प्रदूषणाबाबत कोणतीही तरतूद करण्यात आली नाही. शिवाय केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नदी कृती योजनेमध्ये कृष्णा, गंगा, गोदावरी व तापी या नद्यांचा समावेश करण्यात आला. मात्र महाराष्ट्रातील मोठ्या नद्यांत गणती असणाऱ्या भीमा नदीचा यात समावेश करण्यात आला नाही. राज्य शासनाला उजनी धरणातील पाणी प्रदूषणाबाबत माहिती असतानाही उजनी धरणातील पाणी प्रदूषणावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आला नाही. एकंदरीत उजनी पाणी प्रदूषणाबाबत शासनाचे उदासीन धोरण असल्याचे पाहावयास मिळत आहे. मात्र या प्रदूषित पाण्याचा मनुष्यप्राण्यासह इतरही पशू, पक्षी व वनस्पतींवर विपरित परिणाम होत आहे.