दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 11:55 IST2025-04-19T11:54:36+5:302025-04-19T11:55:33+5:30

तनिषा भिसे प्रकरणात डॉक्टरला वाचवलं जातंय हे आता सरळ सरळ दिसत आहे

Burn the Dinanath Hospital report we will get justice for Tanisha Bhise Supriya Sule | दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे

दीनानाथ रुग्णालयाचा रिपोर्ट जाळून टाका; आम्ही तनिषा भिसेंना न्याय मिळवून देऊ - सुप्रिया सुळे

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रकरणात चौकशांसाठी चार समित्या नेमल्या गेल्या, त्यांचे अहवालही सादर झाले, मात्र अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात चौकशी समित्या, शासन, पोलिस प्रशासन या सर्व यंत्रणांना अपयश आले आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे जीव गमावणाऱ्या तनिषा भिसे या गर्भवतीला न्याय मिळणार का? या विषयी साशंकता निर्माण झाली आहे. हे गंभीर प्रकरण घडून १५ दिवस उलटून गेले आहेत. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या प्रकरणाच्या मुळाशी पोहोचण्यात शासन आणि पोलिस यंत्रणा संभ्रमात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होणार की नाही, याबाबतचा निर्णय कोण घेणार? याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. 

दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, सूर्या हॉस्पिटल, मणिपाल हॉस्पिटल, इंदिरा आयव्हीएफ सेंटरमधील रुग्णांची कागदपत्रे, रुग्णाची वैद्यकीय पार्श्वभूमी, डॉक्टरांचे, रुग्णालय प्रशासनाचे आणि कुटुंबीयांचे जबाब आदी सर्व बाबींची ससूनच्या समितीकडून तपासणी करण्यात आली. त्यानुसार अहवाल वैद्यकीय शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाला पाठवण्यात आला आहे. मात्र, अहवालामध्ये रुग्णालय किंवा डॉक्टरांचा दोष असल्याचा कोणताच स्पष्ट उल्लेख केला नसल्याचे पोलिस प्रशासनाने ससूनच्या समितीकडे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. या रिपोर्टवरून सुप्रिया सुळे यांनी निषेध व्यक्त केला आहे. ते रिपोर्ट जाळून टाका असं त्या म्हणाल्या आहेत.  

सुप्रिया सुळे म्हणाल्या, दिनानाथ चा असा काही रिपोर्ट येऊ शकत नाही. मी या रिपोर्टचा निषेध करते. हा रिपोर्ट जाळून टाका. सरकारचा रिपोर्ट असा येऊ शकतो हे तर धक्कादायकच आहे. आम्ही ते अहवाल मानत नाही. आम्ही कोर्टात जाणार असून प्रशांत जगताप भिसे यांच्या पाठीशी उभे आहेत. यावर सरकारला विचारलं पाहिजे. आम्हाला महिलेला न्याय द्यायचा आहे. डॉक्टर ला वाचवल जातंय हे आता सरळ सरळ दिसत आहे. सरकार कोणाला वाचवत आहे. पण आम्ही याप्रसंगी रस्त्यावर उतरू. पण न्याय मिळवून देऊ. कुठेलेही सत्य सरकार लपवू शकत नाही.

Web Title: Burn the Dinanath Hospital report we will get justice for Tanisha Bhise Supriya Sule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.