शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

आयटी सिटीवर कागदी घोड्यांचा बोजा

By admin | Updated: July 4, 2015 00:20 IST

गेल्या दशकभरात आयटी हब आणि आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत वर्णी लावण्यासाठी राज्यातील प्रमुख शहर म्हणून दावेदार असलेल्या पुणे महापालिकेचा कारभार

पुणे : गेल्या दशकभरात आयटी हब आणि आता केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत वर्णी लावण्यासाठी राज्यातील प्रमुख शहर म्हणून दावेदार असलेल्या पुणे महापालिकेचा कारभार मात्र अद्यापही कागदी घोड्यांवरच सुरू आहे. एकीकडे जगाची वाटचाल पेपरलेस होत असताना, महापालिकेत मात्र, दिवसेंदिवस रद्दीचा ढीग वाढतच असल्याचे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांत तब्बल दीड लाख किलो रद्दीची विक्री महापालिकेने केली असून त्यातून जवळपास १५ लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेस मिळाले आहे. त्यातही आश्चर्याची बाब म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून महापालिकेचे सर्व विभागांची कार्यपद्धती आॅनलाइन होत असताना, दुसरीकडे हे रद्दीचे प्रमाणही दरवर्षी वाढत आहे.कोणतेही शासकीय काम हे कागदांशिवाय होत नाही. महापालिकेतही असे शेकडो कागद दररोज वापरले. त्यात महापालिकेच्या निमंत्रणपत्रिकांपासून ते विविध विभागांमध्ये लागणाऱ्या प्रिंटिंगसाठीच्या कागदांचा समावेश आहे. तर महापालिकेकडे शेकडो नागरिक दररोज विविध विभागांसाठी अर्ज करत असतात, याशिवाय महापालिकेची स्वतंत्र प्रिंटिंग प्रेस असून त्या ठिकाणी पालिकेच्या दैनंदिन कामासाठीची छपाई केली जाते. त्यामुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर कागदाची आवश्यकता भासते. मात्र, तेवढेच प्रमाण वाया जाणाऱ्या कागदांचेही असल्याचे दिसून येते. या रद्दीत, कात्रण, कागदी बोळा, निरस्त, वर्तमानपत्र, जकात रद्दी, टोपलीत टाकण्यात आलेले कागदी बोळे, या रद्दीचा समावेश आहे. महापालिकेत २०१४-१५ या आर्थिक वर्षात साठलेली रद्दी विक्रीसाठी देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने ठेवला असून त्यातून ही माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार, महापालिकेत २०१२-१३ मध्ये तब्बल ४९ हजार ४०० किलो रद्दी तयार झाली. तर २०१३-१४ मध्ये ४२ हजार ६०० किलो रद्दी तयार झाली. तर मागील वर्षी २०१४-१५ मध्ये या रद्दीत तब्बल १३ हजार किलोंची वाढ होऊन हा आकडा ५५ हजार ५०० किलोंच्या घरात पोहोचला आहे.तीन महिन्यांत चौदा लाखांचा महसूल महापालिकेस या रद्दीच्या विक्रीतून गेल्या तीन महिन्यांत सुमारे, १४ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यात २०१२-१३ मध्ये ४ लाख ३३ हजा़र रुपये, २०१३-१४ मध्ये ४ हजार रुपये, २०१४-१५ मध्ये ५ लाख ४८ हजार रुपये मिळाले आहेत; तर या वर्षीच्या विक्रीतून प्रशासन ६ ते ७ लाख रुपये मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.तीन वर्षांपासून महापालिकेच्या सर्व विभागांची कार्यपद्धती आॅनलाइन होत असताना, दुसरीकडे हे रद्दीचे प्रमाणही दरवर्षी वाढत आहे.