शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

पुण्यातील माजी उपमहापौरांच्या मुलाकडून दादागिरी? भर रस्त्यात तरुणाला मारहाण; CCTV व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 15:07 IST

रस्त्याच्या कडेला उभ्या गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने माझा तोल गेला अन्...

पुणे - पुणे महानगरपालिकेतील माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलाने दुचाकी चालकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गाडीला धक्का लागल्याचे निमित्त ठरले आणि त्यानंतर झालेल्या वादावादीतून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वादावादीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके प्रकरण काय?

21 जानेवारी रोजी सायंकाळी फिर्यादी फायझ मोहम्मद हनीफ सय्यद हे जुना बाजार परिसरातून दुचाकीवरून जात होते. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीचा दरवाजा अचानक उघडला. यामुळे फायझ यांचा तोल गेला आणि त्यांची दुचाकी हेमंत बागुल यांच्या चारचाकी गाडीला धडकली.

या धडकेतून संतप्त झालेल्या हेमंत बागुल यांनी फायझ मोहम्मद यांना मारहाण केल्याचा आरोप फायझ यांनी केला आहे. तसेच, यावेळी हेमंत यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिल्याचाही दावा फायझ यांनी केला आहे.

फायझ मोहम्मद म्हणाले, “रस्त्याच्या कडेला उभ्या गाडीचा दरवाजा अचानक उघडल्याने माझा तोल गेला आणि दुचाकी चारचाकीला धडकली. त्यानंतर मला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली.”

हेमंत बागुल यांचे स्पष्टीकरणदरम्यान, या प्रकरणावर आता माजी उपमहापौर आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले, “व्हायरल झालेला व्हिडिओ अर्धवट असून तो पूर्ण पाहणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता माझे वाहन सिग्नलवर थांबलेले होते. त्या वेळी फायझ मोहम्मद यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत डाव्या बाजूने ओव्हरटेक केले आणि माझ्या वाहनाला मागून धडक दिली. मी त्याला जाब विचारला तेव्हा त्याने अरेरावी, दादागिरी आणि शिवीगाळ केली. हे प्रकरण प्रसिद्धीसाठी किंवा माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी उभे केले गेले आहे.” हेमंत बागुल यांनीही याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय