शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम विकास नियमावली बिल्डरधार्जिणी

By admin | Updated: March 11, 2015 01:08 IST

बांधकाम व्यावसायिकांनी अ‍ॅमिनिटी स्पेससाठी (मोकळ्या जागेसाठी) १५ टक्क्यांऐवजी ५ टक्के जागा सोडावी, थिएटर, मॉल, शाळा

पुणे : बांधकाम व्यावसायिकांनी अ‍ॅमिनिटी स्पेससाठी (मोकळ्या जागेसाठी) १५ टक्क्यांऐवजी ५ टक्के जागा सोडावी, थिएटर, मॉल, शाळा, हॉस्पिटल यांना फायरच्या एनओसीची आवश्यकता नाही, प्रिमीयम चार्ज वगळण्यात यावा, पार्किंगचे मजले उंचीमधून वगळावेत, थिएटर, मॉलसमोर १५ मीटरऐवजी १२ मीटरचा रस्ता असावा, असे बांधकाम व्यावसायिकांना फायदेशीर ठरणारे बदल विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल)मध्ये करण्यात आले आहेत. डीसी रूलमध्ये नियमावलीमध्ये नियोजन समितीने सुचविलेल्या या बदलांच्या शिफारशींवर मुख्य सभेत अंतिम निर्णय होणार आहे.महापालिकेच्या मुख्य सभेसमोर जुन्या हद्दीच्या विकास आराखड्याचे (डीपी) सादरीकरण करण्यास मंगळवारपासून सुरुवात करण्यात आली. नगरअभियंता प्रशांत वाघमारे यांनी डीसी रूलच्या इंग्रजीमधील शिफारशींचे मराठी भाषांतर करून त्याचे सादरीकरण केले. जुन्या डिसी रूलमध्ये बदल करण्याबाबत नियोजन समितीने सुचविलेल्या शिफारशी त्यांनी सभागृहाला समजावून दिल्या. थिएटर, मॉल, मार्केट, स्टेडियम, शाळा, हॉस्पिटसमोर यांसमोेर १५ मीटरच्या रस्ता ठेवावा लागणार होता, त्याकरिता संबंधितांना जागा सोडणे बंधनकारक होते; मात्र नियोजन समितीने ही १५ मीटरऐवजी १२ मीटरच्या रस्त्याची दुरुस्ती सुचवली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी वाहतूककोंडीचा सामना पुणेकरांना करावा लागणार आहे. एक एकरापुढील प्लॉटकरिता १५ टक्के मोकळी जागा (अ‍ॅमिनिटी स्पेस) सोडणे बंधनकारक होते. मात्र, त्यामध्ये बदल करून १५ टक्क्यांऐवजी ५ टक्के जागा मोकळी सोडावी, अशी शिफारस केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांना १० टक्के जागा बांधकामासाठी जास्तीची उपलब्ध होणार आहे. आगीच्या दुर्घटना घडू नयेत म्हणून मोठ्या इमारतींना फायर एनओसी घेणे आवश्यक असताना ती तरतूद वगळण्यात आली आहे.पार्र्किंगसाठी जेवढे मजले बांधले जातील, ते इमारतीच्या उंचीमधून वगळण्याची सवलत देण्यात आली. गावठाणामधील पार्र्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागा विकसित करून खालचे मजले महापालिकेच्या ताब्यात देण्याची सूट जागामालकांना देण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल घटकातील लोकांना घरे उपलब्ध करून देण्याची तरतूद वगळण्यात आली आहे.आर्किटेक्टनी शहरात काम करण्याची महापालिकेचा परवाना घेण्याची आवश्यकता नाही. तसेच, त्यांना पालिका आयुक्तांना ब्लॅकलिस्ट करता येणार नाही, अशी तरतूद डीसी रूलमध्ये करण्यात आली आहे. डीपी रस्त्यासाठी महापालिकेने ताब्यात घेतलेल्या जागेचा मोबादला जागामालकाने घेतला नसल्यास तो आता द्यावा. (प्रतिनिधी)