शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

रिंगरोडच्या १३४ किलोमीटर मार्गावर उभारणार बीआरटी ट्रॅक : किरण गित्ते  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2018 12:07 PM

पीएमआरडीएच्या वतीने वर्तुळाकार बीआरटी मार्ग बनविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यातील ३३ किलोमीटरचे काम सुरू पीएमआरडीएच्या या रिंगरोडची एकूण लांबी १२८ किमी तर रुंदी ११० मीटर नगर रस्त्यावर १४ किलोमीटर मार्गावर बीआरटीचे १३ स्टेशन्स उभारण्यात येणार बीआरटीचे १८ ठिकाणी होणार मल्टी मॉडेल हब

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील व तसेच या दोन्ही महानगरपालिकेच्या लगतच्या भागातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी रिंगरोडचे काम सुरू आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए) वतीने या मार्गावर वर्तुळाकार बीआरटी मार्ग बनविण्यात येणार आहे. जवळपास १३४ किलोमीटर मार्गावर बीआरटी बस धावणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली. पीएमआरडीएच्या या रिंगरोडची एकूण लांबी १२८ किमी आहे. तर रुंदी ११० मीटर आहे.  पहिल्या टप्प्यातील ३३ किलोमीटरच्या सातारा रस्ता ते अहमदनगर रस्ता (कात्रज ते वाघोली) रिंगरोडचे काम सुरू आहे. नगर रस्त्यावर १४ किलोमीटर मार्गावर बीआरटीचे १३ स्टेशन्स उभारण्यात येणार आहे. पीएमआरडीएच्या वतीने (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) तयार करण्याचे काम एल अ‍ॅँड टी कपंनीला दिले होते. त्याचा सर्वकष अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये मेट्रो, रिंगरोड, रेल्वे (लोकल) मार्ग, बीआरटी आणि टाऊन प्लॅनिंगच्या योजना आणि रस्ते विकासासाठी अनेक प्रस्ताव मांडण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी महापालिकेकडून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मार्गावर मेट्रो प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे..........................पुण्याच्या १२८ किलोमाीटर रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरूवात झाली आहे. उर्वरित मार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मार्गाचे भूसंपादनाचे काम झाले असून, प्रत्यक्ष कामाला सुरूवात देखील झाली आहे. एकदा काम सुरू झाल्यावर त्यामध्ये खंड पडायला नको म्हणून पुढच्या टप्प्यातील जागेचेही भूसंपादन सुरू आहे. - किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए..............२०२८ पर्यंत या मार्गावर धावणार बीआरटीयेरवडा ते विमानतळ गेट (५.०५ कि.मी.)कस्पटे वस्ती ते काळेवाडी फाटा (१.८ कि.मी.)एचसीएमटीआर ते पुणे महापालिका (३८.४५ कि.मी.)एचसीएमटीआर ते पिंपरी-चिंचवड महापालिका (३१.४ कि.मी.)चिंचवड-तळवडे (१२ कि.मी.)बीआरटी मार्ग-पश्चिम बाह्यवळण मार्ग (४९ कि.मी.)  .......................बीआरटीचे १८ ठिकाणी होणार मल्टी मॉडेल हबदोन्ही महानगरपालिका आणि पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वारजे, स्वारगेट, शिवाजीनगर, वल्लभनगर, चिंचवड, निगडी भक्ती-शक्ती चौक, नाशिक फाटा, बालेवाडी, वाकड, हिंजवडी, चांदणी चौक, वडगाव बुद्रुक, खराडी, पुलगेट, कात्रज, हडपसर, वाघोली, मोशी आदी दोन्ही शहरांतील १८ ठिकाणी मल्टी मॉडेल हब करण्याचा २० वर्षांच्या सर्वकष वाहतूक आराखड्यात प्रस्तावित करण्यात आले आहे.  

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते