शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीला बांगलादेशातून आणले, तुळशीबागेत एका खोलीत ठेवले, बुधवार पेठेत ३ लाखांत विकले

By नितीश गोवंडे | Updated: April 12, 2025 18:11 IST

‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते

पुणे : बांगलादेशमधून मैत्रिणीसोबत ‘ती’ ७-८ महिन्यांपूर्वी पुण्यात आली. मैत्रिणीने भोसरी येथे काही दिवस तिला आपल्या सोबत ठेवले. आठ ते दहा दिवस तिला पुण्यात फिरवले. त्यानंतर तुळशीबाग परिसरातील एका खोलीत तिला नेऊन ठेवले. काही दिवसांनी बुधवार पेठेत तिची विक्री करून मैत्रिणीने बांगलादेशात पळ काढला. तीने काही दिवसांपूर्वी तेथून पळ काढत हडपसर पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

हडपसर पोलिसांनी ‘शून्य’ ने गुन्हा दाखल करत तो फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून उर्वरीत २-३ जणींचा पोलिस शोध घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ वर्ष ३ महिन्यांची एक अल्पवयीन मुलगी तिच्या सुमय्या नामक मैत्रिणीसोबत बांगलादेश येथून पुण्यात आली. मैत्रिणीने तिला काही दिवस सोबत ठेवून तिची ३ लाखांत विक्री केल्याचे पीडिता सांगत आहे. सुरूवातीला तुळशीबाग परिसरात त्यानंतर बुधवार पेठेतील एका रूममध्ये तिला डांबून ठेवण्यात आले होते. तिला वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात होते. पीडितेला आरोपी महिलांनी पोलिसांची धमकी दिली. ‘तू परदेशी नागरिक आहेस, खोलीबाहेर गेलीस तर, पोलिस तुला पकडतील’ असे तिला सांगितले जात होते. २ एप्रिल रोजी पीडितेने बुधवार पेठेतून पळ काढला. त्यानंतर ती शहरात घाबरून फिरत होती. अखेर पीडितेने हिंमत करत हडपसर पोलिस ठाणे गाठले. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी शून्य ने गुन्हा दाखल करून तो आधी विश्रामबाग आणि नंतर फरासखाना पोलिसांकडे वर्ग केला. फरासखाना पोलिसांनी लगेचच पीडितेने दिलेल्या माहितीनुसार तिला ज्याठिकाणी डांबून ठेवले होते, तेथे जात एका महिलेला अटक केली. तसेच पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून एकूण ४ ते ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उर्वरीत आरोपींचापोलिस शोध घेत आहेत. आरोपींनी आणखी कुणा मुलीची अशाप्रकारे विक्री केली आहे का? याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमुळे शहरात मानव तस्करीचे प्रकार होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

टॅग्स :Puneपुणेbudhwar pethबुधवार पेठWomenमहिलाMONEYपैसाBangladeshबांगलादेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी