Pune Crime : बहिणीला त्रास दिला म्हणून भावाने केला तरूणाचा खून; खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 18:55 IST2022-11-04T18:54:37+5:302022-11-04T18:55:41+5:30

मक्याच्या शेतात अक्षय मांदळे याला गाठून कोयत्याने मानेवर, हातावर सपासप वार केले....

Brother kills youth for harassing sister; Incidents in Khed Taluka pune crime | Pune Crime : बहिणीला त्रास दिला म्हणून भावाने केला तरूणाचा खून; खेड तालुक्यातील घटना

Pune Crime : बहिणीला त्रास दिला म्हणून भावाने केला तरूणाचा खून; खेड तालुक्यातील घटना

राजगुरुनगर (पुणे) : बहिणीला त्रास वारंवार देतो या कारणावरून चिडून भावाने २४ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना (दि. ४) वाफगाव (ता. खेड) येथे घडली आहे. अक्षय रोहिदास मांदळे (रा. मांदळेवाडी वाफगाव ता. खेड ) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी अभिजित मच्छिंद्र मांदळे (वय २२ रा. मांदळेवाडी वाफगाव ता. खेड ) याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिजित मांदळे यांच्या बहिणीचे लग्न ठरले होते. मयत अक्षय मांदळे हा वारवांर त्रास देऊन आरोपीच्या बहिणीला माझ्याशी लग्न कर असे म्हणत होता. याचा राग मनात धरून चिडून अभिजित मांदळे यांने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मांदळेवाडी येथील शेत शिवारात मक्याच्या शेतात अक्षय मांदळे याला गाठून कोयत्याने मानेवर, हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात अक्षय मांदळे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक विजय चौहान, पोलिस उपनिरिक्षक भारत भोसले, पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेऊन खुनाची कबुली दिली आहे. याबाबत मयत मुलाची आई विमल मांदळे यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरिक्षक विजयसिंह चौहान करित आहे.

Web Title: Brother kills youth for harassing sister; Incidents in Khed Taluka pune crime