शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक टाळण्यासाठी ब्रोकर आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:29 IST

.......... लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना कालावधीत स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प झाले होते मात्र भाडेकरू आणि मालक ...

..........

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना कालावधीत स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प झाले होते मात्र भाडेकरू आणि मालक यांच्यातील बहूतांश वाद ब्रोकरनी सोडवले, परिणामी संघर्ष टळला. त्यामुळे ग्राहक खात्रीशीर व्यवहारांसाठी भविष्यातही आम्हालाच प्राधान्य देतील, असे प्रतिपादन श्री स्वामी समर्थ रिअल इस्टेटचे संचालक पराग पासलकर यांनी ʻलोकमतʼ बरोबर बोलतांना केले.

पासलकर म्हणाले, कोरोना काळामध्ये घरांचे व्यवहार करताना किंवा फ्लॅट भाड्याने देताना घेताना बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यात ग्राहक, बांधकाम व्यावसायिक, भाडेकरू घरमालक अशा सर्वांचाच संबंध होता. भाडेकरूने, अचानक घर खाली करणे, मालकाने जबरदस्ती करणे, अशा अनेक गोष्टींमुळे भाडेकरू आणि मालक यांच्यामध्ये वाद झाले होते. अशा वेळेस ब्रोकर यांनी दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करून वाद मिटवले. परिणामी, संघर्षाचे अनेक प्रसंग टळले. कठीण परिस्थितीमध्ये ब्रोकर हा घरमालकांना देवासारखा मदतीला धावून गेला होता.

सध्या अजूनही कोरोनामुळे रिअल इस्टेट मार्केट काही प्रमाणात ठप्प आहे. त्यामुळे ब्रोकरवर मोठे संकट आले आहे. या कठीण प्रसंगात, समाजाने एजंटला योग्यप्रकारे समजून घेतले आणि एजंटमुळे होणारे फायदे लक्षात घेतले तर बाजारातील मरगळ दूर होईल. अर्थचक्र पून्हा चालू होईल. जुनी मालमत्ता विकत घेताना त्या प्रॉपर्टीची संपुर्ण माहिती ही एजंटला असते. नवीन वास्तुप्रकल्पामध्ये फ्लॅट घेत असताना एजंट महत्वाचा का असतो त्याचे कारण बिल्डर कोणकोणत्या प्रोजेक्टमध्ये आहे त्याचे दर व प्रोजेक्टची पार्श्वभूमी ही माहिती ग्राहकांपेक्षा एजंटला असते. तो प्रोजेक्ट कधी पूर्ण होणार आहे व त्याला काही अडचणी आहेत का, याची माहिती सामान्य ग्राहकांपेक्षा इस्टेट एजंट व्यवस्थित देऊ शकतो, असेही पासलकर यांनी सांगितले.