पालिका लिपिकावर लाचप्रकरणी गुन्हा

By Admin | Updated: July 3, 2014 05:49 IST2014-07-03T05:49:35+5:302014-07-03T05:49:35+5:30

विनोद सतीश लांडगे (वय ३०, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. तो पालिकेच्या घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात कनिष्ठ श्रेणी लिपीक आहे

Bribery case against municipal clerk | पालिका लिपिकावर लाचप्रकरणी गुन्हा

पालिका लिपिकावर लाचप्रकरणी गुन्हा

पुणे : नवीन खरेदी केलेल्या फ्लॅटच्या टॅक्स पावतीवर नाव लावण्यासाठी ९ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी महापालिका लिपिकाविरुद्ध डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
विनोद सतीश लांडगे (वय ३०, रा. पुणे) असे त्याचे नाव आहे. तो पालिकेच्या घोले रोड
क्षेत्रीय कार्यालयात कनिष्ठ श्रेणी लिपीक आहे. एका फ्लॅटच्या मिळकत करपावतीवर नाव बदलण्यासाठी लांडगेने लाच मागितली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Bribery case against municipal clerk