शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

विकासाच्या ‘लाईफलाईन’ला ब्रेक

By admin | Updated: July 14, 2015 04:06 IST

१९८७ पासून प्रारूप विकास आराखड्याचा घोळ, अंतर्गत रिंगरोडच्या भूसंपादनाला अडथळे, रस्ते रुंदीकरणाला विरोधामुळे शहरातील रस्त्यांचा विकास रखडलेला आहे.

- हणमंत पाटील, पुणे१९८७ पासून प्रारूप विकास आराखड्याचा घोळ, अंतर्गत रिंगरोडच्या भूसंपादनाला अडथळे, रस्ते रुंदीकरणाला विरोधामुळे शहरातील रस्त्यांचा विकास रखडलेला आहे. राष्ट्रीय मानकांनुसार शहरातील साधारण १३ टक्के क्षेत्र रस्ते विकासाखाली आवश्यक आहे. मात्र, पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरात हे क्षेत्र ६.५ टक्के इतके नगण्य आहे. त्यामुळे मेट्रो, मोनोरेल, बीआरटी व ‘एचसीएमटीआर’ सारखे मोठे वाहतूक विकास प्रकल्पांना अडथळा निर्माण झाला असून, विकासाला ब्रेक लागला आहे.मेट्रो व स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुण्याचा विकास झपाट्याने होत आहे. कोणत्याही शहराच्या विकासासाठी रस्ते हे ‘लाईफलाईन’प्रमाणे महत्त्वाचे असतात. मात्र, पुण्याचा विकास व विस्तार ज्या झपाट्याने होतोय, त्या प्रमाणात रस्त्यांचा विकास होताना दिसत नाही.जुन्या हद्दीच्या १९८७ च्या विकास आराखड्याची (डीपी) २० वर्षांत केवळ २५ टक्के अंमलबजावणी झाली. त्यामुळे २००७ पासून या रखडलेल्या आराखड्याचे सिंहावलोकन करण्यात आले. अखेर महापालिकेने २०१२ ते २०१५ या तीन वर्षांत प्रारूप विकास आराखडा तयार केला. डीपीवरील सुनावणीवेळी सर्वाधिक ७० ते ८० टक्के हरकती रस्ता रुंदीकरण रद्द करण्यावर होत्या. त्यानंतर आराखड्यावर आरोप झाल्यानंतर राज्य शासनाने तो ताब्यात घेतला असून, अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही.शहरातील अंतर्गत वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) प्रकल्प प्रस्तावित केला. या अंतर्गत रिंगरोडच्या ३४ किलोमीटर लांबी व २४ किमी रुंदीच्या रस्त्याचे भूसंपादनाचे काम १० ते १२ वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत केवळ ३० टक्के जमिनीचे भूसंपादन झाले आहे. मात्र, रिंगरोडसाठी लागणारी २८.४७ हेक्टर जागा राज्य शासनाच्या विविध विभागांशी संबंधित असून ही जागा ताब्यात देण्यास शासनाच्या मान्यतेची प्रतीक्षा आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घाईगडबडीत आणलेला बीआरटीचा सातारा व हडपसर रस्त्यावरील प्रायोगिक प्रकल्प अयशस्वी झाला. त्यामुळे नगर व आळंदीचा प्रकल्प सुरू करण्यास प्रशासन धजावत नाही. शहरात पुरेशा रुंदीचे रस्ते नसल्याने मेट्रो प्रकल्प भुयारी की जमिनीवर असा वाद सुरू आहे. त्यामुळे केंद्राकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत.प्रमुख रस्त्यांवरील भार कमी करण्यासाठी शिवणे ते खराडी रस्ता प्रस्तावित केला. मात्र, नदीकाठच्या या रस्त्याचे रजपूत झोपडपट्टी परिसरात भूसंपादन रखडले आहे. शहरातील रस्त्यांच्या विकासाला ब्रेक लागल्याने वाहतूक विकास प्रकल्प रखडत चालले आहेत. वाहतूक व रस्ते विकासाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आवश्यकता आहे.दरवर्षी दोन लाख वाहनांची भर...पुणे महानगरात २०१२ मध्ये २२ लाख ६७ हजार वाहनांची नोंद होती. मार्च २०१३ मध्ये २४ लाख ६६ हजार आणि मार्च २०१४ मध्ये २६ लाख ६६ हजार वाहनांची नोंदणी झाली आहे. याचा अर्थ दरवर्षी दोन लाख वाहनांची भर पडत आहे. सार्वजनिक वाहतूक सक्षम नसल्याने एकूण वाहनांमध्ये दुचाकींचे प्रमाण ७५ टक्के आहे. त्याप्रमाणात रस्ते व वाहतूक प्रकल्प विकसित होताना दिसत नाही.