बसप्रवासात चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

By Admin | Updated: June 27, 2017 07:53 IST2017-06-27T07:53:51+5:302017-06-27T07:53:51+5:30

बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली.

Both of the gang stolen were stuck in the bus | बसप्रवासात चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

बसप्रवासात चोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बसप्रवासात गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्समधील ऐवज लंपास करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपये किमतीचे ७२ ग्रॅम सोने जप्त करण्यात आले आहे. त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे.
याप्रकरणात त्यांच्या एका साथीदाराला यापूर्वीच अटक करण्यात आली असून, अन्य २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत ऊर्फ परश्या अनिल पवार (वय २७), संतोष ऊर्फ मॅनेजर शरणप्पा जाधव (वय २८, दोघेही रा. सर्वोदय कॉलनी, मलम्मा निवास, मुंढवा) अशी कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत. सनी पॉल, आकाश ऊर्फ गज्जी (दोघेही रा. मुंढवा) यांंच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २० जून रोजी मुंढवा परिसरात घडली. गुन्ह्यातील चोरीला गेलेला मोबाईल जप्त करायचा आहे. त्यांच्या इतर २ साथीदारांना अटक करायची असल्याने सहायक सरकारी वकिलांनी पोलीस कोठडीची केलेली विनंती न्यायालयाने ग्राह्य धरली.

Web Title: Both of the gang stolen were stuck in the bus