चोरट्या गुन्ह्यातील दोघे जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:38+5:302021-02-05T05:05:38+5:30

विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे, दीपक ऊर्फ आशिका जात काळे (वय २५ दोघे रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) ...

Both arrested for theft | चोरट्या गुन्ह्यातील दोघे जेरबंद

चोरट्या गुन्ह्यातील दोघे जेरबंद

विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे, दीपक ऊर्फ आशिका जात काळे (वय २५ दोघे रा. निघोज, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार : लोणी-पाबळ रस्त्यावर असलेल्या बांधनवस्ती येथे नानाभाऊ दगडू आदक (वय ६०), पत्नी मीरा (वय ५५) व आई यमुनाबाई दगडू आदक ( वय ९० ) असे तिघे जण राहतात. सोमवारी १४ डिसेंबर २०२० रोजी पहाटे अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा वाजवून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. अज्ञात चोरट्याने नाना आदक यांच्या डोक्यावर लोखंडी सळई मारली व मीरा आदक, यमुणाबाई आदक यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने काढून घेतले. मीरा आदक यांच्या कानातील सोन्याच्या कुड्या ओरबाडून नेल्या होत्या. चोरट्यांनी दागिने व रोख रक्कम मिळून ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. या अज्ञात चोरट्यांविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यातील आरोपी विशाल उर्फ कोंग्या नरेश काळे, दीपक ऊर्फ आशिका जात काळे (वय २५ दोघे रा. निघोज ता. पारनेर जि. अहमदनगर) यांना आळेफाटा पोलीस ठाणे यांनी अटक केली असून त्यांनी मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या चोरीचा गुन्हा कबूल केला आहे. या आरोपींना पुढील तपासासाठी मंचर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

Web Title: Both arrested for theft