शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जरोखे कागदावरच, निविदा प्रसिद्ध

By admin | Updated: May 9, 2017 03:49 IST

तब्बल ३ हजार २०० कोटी रुपयांच्या वादग्रस्त २४ तास पाणी योजनेसाठी कर्जरोखे काढण्याचा प्रस्ताव अद्याप कागदावरच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : तब्बल ३ हजार २०० कोटी रुपयांच्या वादग्रस्त २४ तास पाणी योजनेसाठी कर्जरोखे काढण्याचा प्रस्ताव अद्याप कागदावरच आहे. मात्र तो मंजूर होणार असे गृहीत धरून प्रशासनाने या योजनेतील जलवाहिन्या बदलण्याच्या १ हजार ८१८ कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यात टाकलेले २२५ कोटी रुपयांचे केबल्ससाठी डक्ट तयार करण्याचे काम वादग्रस्त होत आहे.एकूण ३ हजार २०० कोटी रुपयांच्या या योजनेचा खर्च कर्जरोखे उभे करून करण्यात येणार आहे. त्यासाठीची आवश्यक ती सर्व पूर्वतयारी प्रशासनाने केली आहे. त्यात देशी-परदेशी वित्तीय संस्थांचे महापालिकेला मिळालेले मानांकन ताळेबंदाची तपासणी, याचा समावेश आहे. इतकेच काय पण कर्जरोखे कोण घेणार, याचीही तयारी काही अंशी पूर्ण झाल्याची चर्चा आहे. मात्र, यातील आश्चर्याची बाब अशी की, असे कर्जरोखे काढण्यासाठी अद्याप सर्वसाधारण सभेची मंजुरीच मिळालेली नाही. तरीही त्यातील कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.कर्जरोखे काढण्याचा विषय स्थगित ठेवून यासंबंधी पुढील सर्वसाधारण सभा निर्णय घेईल, असे ठरवण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने अद्याप नव्या पंचवार्षिकमध्ये हा कर्जरोख्यासंबंधीचा प्रस्ताव ना स्थायी समितीसमोर मांडला आहे ना सर्वसाधारण सभेसमोर. वेगवेगळ्या भागांत असलेल्या पाण्याच्या ९२ साठवण टाक्या बांधण्याचे काम खर्चातून करण्यात येत आहे.