शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

नोकरी नसल्याने तरुणाने दिली बॉम्बने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 9:01 PM

तो चांगला शिकला सवरलेला, लग्नही झालेले असे असताना त्याला नोकरी मिळत नव्हती़. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाने नोबल हॉस्पिटलला ई मेल  करुन १० लाखांची खंडणी मागितली़ नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उघडवून देण्याची धमकी दिली होती़ .

पुणे : तो चांगला शिकला सवरलेला, लग्नही झालेले असे असताना त्याला नोकरी मिळत नव्हती़. त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या या तरुणाने नोबल हॉस्पिटलला ई मेल  करुन १० लाखांची खंडणी मागितली़ नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उघडवून देण्याची धमकी दिली होती़ .सायबर पोलिसांनी या तरुणाचा छडा लावून त्याला अटक केली आहे़.प्रविण हिराचंद कुंभार (वय ३१, रा़ पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे़.

पोलिसांनी सांगितले की, प्रविण कुंभार हा मुळचा बारामती तालुक्यातील असून त्याने एम एस्सी फिजिक्स केले आहे़ .त्यानंतर त्याने अनेक खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली़ पण कोठेच तो टिकू शकला नाही़. गेल्या काही दिवसांपासून त्याला नोकरी नव्हती़. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता़. त्याला एक बंद पडलेला मोबाईल सापडला़ त्याने तो दुरुस्त करुन घेतला़. वडिलांकडून पैसे घेऊन तो गोव्याला गेला होता़.  त्यानंतर त्याने मोबाईलवर बनावट ई मेल खाते तयार केले़, त्यावरुन त्याने प्रथम ३१ जानेवारी व त्यानंतर ७ फेब्रुवारी रोजी नोबेल हॉस्पिटलला ई मेल करुन १० लाख रुपयांची मागणी केली़ पैसे दिले नाही तर बॉम्बने हॉस्पिटल उडवून देण्याची धमकी दिली़. या ई मेलने एकच खळबळ उडाली होती़. पोलिसांनी संपूर्ण हॉस्पिटलची तपासणी केली़ त्यात काहीही आढळून आले नाही़.या गुन्ह्यातील ई मेलचे तांत्रिक विश्लेषण सायबर पोलिसांनी केल्यावर तो गोव्याहून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले़. त्यानंतर प्रविणला वाई येथून ताब्यात घेण्यात आले़. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे़. त्याला अधिक तपासासाठी हडपसर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, पोलीस उपनिरीक्षक किरण औटे, शिरीष गावडे, प्रवीणसिंग राजपूत, संतोष जाधव, प्रसाद पोतदार यांच्या पथकाने केली.असुरक्षित वाय फाय कनेक्शन वापरअनेक जण वाय फाय कनेक्शन घेतात़  त्याचा पासवर्ड सिक्युअर्ड नसतो़ प्रविण याने गोव्यातून इंटरनेटची सातस्तरीय सुरक्षा भेदून बनावट मेल आयडी तयार केला़ त्याने महाराष्ट्र व गोव्यात फिरत असताना वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे विना पासवर्ड वाय फाय व हॉट स्पॉटचा शोध घेऊन त्याचा वापर केला होता़ त्यामुळे प्रत्यक्ष आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी सायबर पोलिसांना संबंधित कंपनीकडून तातडीने माहिती प्राप्त करुन घेण्यात अनेक अडचणी आल्या.

टॅग्स :Bombsस्फोटकेjobनोकरीhospitalहॉस्पिटलcyber crimeसायबर क्राइम