सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 10:48 IST2021-06-02T10:46:50+5:302021-06-02T10:48:10+5:30

रविवारपासून तरुण होता बेपत्ता, अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

The body of a young man was found in the water tank of Dhayrit Society. | सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड

सोसायटीत पाण्याच्या टाकीमध्ये आढळला तरूणाचा मृतदेह, तपासात गळा दाबून खून झाल्याचे उघड

ठळक मुद्देगेल्या एक वर्षापासून नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील आपल्या पत्नीसमवेत राहत आहे

धायरी: सोसायटीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत तरुणाचा मृतदेह आढळला आहे. तपासात त्याचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले आहे.  कृष्णकुमार प्रसाद (वय: २८, रा अभिनव कॉलेज जवळ, नऱ्हे, पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णकुमार गेल्या एक वर्षापासून नऱ्हे येथील अभिनव कॉलेज परिसरातील आपल्या पत्नीसमवेत राहत आहे. तो उदरनिर्वाहासाठी सुतारकाम करीत होता. रविवारपासून कृष्णकुमार बेपत्ता होता. दरम्यान कुटुंबीयांनी शोधाशोध केली असता सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये असणाऱ्या पाण्याच्या टाकीत त्याचा मृतदेह आढळून आला.

याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शववि्छेदनासाठी ससूनला पाठविण्यात आला. दरम्यान मंगळवारी शववि्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याचा गळा दाबून खून झाल्याचे उघड झाले. याबाबत अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघमारे करीत आहेत.

Web Title: The body of a young man was found in the water tank of Dhayrit Society.