सोमेश्वरच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा; २० पैकी १२ जागेवर राष्ट्रवादीची आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:02 IST2021-10-14T17:58:05+5:302021-10-14T18:02:03+5:30
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने धुव्वा उडवला असून २० पैकी ...

सोमेश्वरच्या निवडणुकीत भाजपचा धुव्वा; २० पैकी १२ जागेवर राष्ट्रवादीची आघाडी
सोमेश्वरनगर: बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलने धुव्वा उडवला असून २० पैकी १२ जागेंवर तब्बल १६ हजार मताधिक्याने विजय मिळवला आहे.
गट क्रमांक एक ते चारची मतमोजणी झाली असून असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुरुस्कृत सोमेश्वर विकास पॅनेलचे अभिजित काकडे, लक्ष्मण गोफणे, जितेंद्र निगडे, ऋषिकेश गायकवाड, पूरूषोत्तम जगताप, राजवर्धन शिंदे, अनंदकुमार होळकर, शिवाजीराजे निंबाळकर, किसन तांबे, सुनील भगत, रणजित मोरे व हरिभाऊ भोंडवे यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे.
आज सकाळी आठ वाजता बारामती येथील कृष्णाई लॉन्स याठिकाणी ही मतमोजणी सुरू झाली. सकाळी आठ वाजता पहिल्या गटाची मतमोजणीला सुरुवात झाली. सोमेश्वर करखण्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ जागांसाठी तब्बल ५३५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सोमेश्वर विकास पॅनेल व भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनल आमने सामने उभे होते.
अर्ज माघारी नंतर २१ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणार उभे होते. यासाठी दि. १४ रोजी यासाठी मतदान पार पडले. यामध्ये २० हजार ५३३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आज मतमोजणी पार पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप पुरुस्कृत सोमेश्वर परिवर्तन पॅनेलला काही मतावरच समाधान मानावे लागेल आहे.