Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2024 12:51 IST2024-10-07T12:50:59+5:302024-10-07T12:51:16+5:30

अनेकांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा मात्र सर्वांना घेऊन फायदा नाही

BJP's conspiracy is to get someone close; Criticism of Rohit Pawar | Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

Rohit Pawar: एखाद्याला जवळ करून संपवायचं हेच भाजपचं कारस्थान; रोहित पवारांची टीका

पुणे : एखाद्याला जवळ करून संपवायचे हेच भाजपचे कारस्थान आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनाही तसेच केले, आता अजित पवार यांचेही भाजप तेच करत आहे. तिसरी आघाडी ही केवळ मत विभागणी करेल.भाजपच्याच फायद्याचे काम ते करणार असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे. पुण्यात आमदार रोहित पवार हे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बंजारा समाजाचे हरिलाल राठोड, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नातू ययाती नाईक, डॉ. श्याम जाधव, भोजराज चव्हाण आदी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोहरादेवीच्या धार्मिक कार्यक्रमात बंजारा समाजासाठी काँग्रेसने काहीच केले नाही, अशी खोटी माहिती दिली. आपल्या स्वार्थी राजकारणासाठी पंतप्रधान मोदी व भाजपने खोटा इतिहास पसरवू नये. तत्कालीन पंतप्रधान नेहरू व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भटक्या विमुक्त समाजाच्या माथ्यावर असणारा गुन्हेगारीचा शिक्का पुसला आहे. त्यामुळे मोदी यांनी समाजाला भ्रमित करण्याचे काम करू नये. विदर्भातील काही मतदारसंघातील इच्छुकांनी आज भेट घेतली. अनेकांना आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. मात्र सर्वांना घेऊन फायदा नाही, निष्ठावंतांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे.

Web Title: BJP's conspiracy is to get someone close; Criticism of Rohit Pawar