शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला मध्यम अन् उच्च मध्यमवर्गाच्या जोरावर देश चालवायचाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:02 IST

पुणे : भारतीय जनता पक्षाला फक्त मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाच्या जोरावर देश चालवायचाय. त्यांना गोरगरिबांशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणेदेणे ...

पुणे : भारतीय जनता पक्षाला फक्त मध्यम आणि उच्च मध्यमवर्गाच्या जोरावर देश चालवायचाय. त्यांना गोरगरिबांशी आणि शेतकऱ्यांशी काहीही घेणेदेणे नाही. केंद्राच्या धोरणामुळे देशातील कृषी व्यवसाय उद्ध्वस्त होण्याची भीती नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर यांची व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्री सोमवारी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुणगेकर यांची पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी काॅंग्रेसचे राज्य प्रवक्ते आणि राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष गोपाळ तिवारी, शहर काँग्रेसचे उपाध्यक्ष सुर्यकांत मारणे, प्रसन्न पाटील, सलीम शेख, महेश अंबिके, संजय अभंग, सुरेश उकरंडे उपस्थित होते. मुणगेकर म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था नकारात्मक दिशेला जात आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमध्ये घातलेल्या घोळामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला ओहोटी लागली आहे.

कोरोनासोबत सरकारची चुकीची धोरणे याला कारणीभूत आहेत. केंद्राच्या अर्थविषयक सर्वेक्षणात ११ टक्क्यांची वाढ होईल, असा चमत्कारीक दावा करण्यात आला आहे. ही अशक्यप्राय गोष्ट असून पाच टक्क्यांचीही वाढ होणे शक्य नाही. आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब कुठेही दिसत नाही. फाइव्ह ट्रिलियन डॉलर अर्थात ३५० लाख कोटींची अर्थव्यवस्था कशी करणार, या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत. पंतप्रधान आणि अर्थमंत्री अर्थव्यवस्थेला गांभिर्याने घेत नाहीत.

सूक्ष्म-लघू-मध्यम उद्योगांकडे लक्ष दिले जात नाही. फक्त बड्या उद्योजकांना कंत्राटे दिली जात आहेत. केंद्राच्या अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेला बळकटी देणासाठी आशादायक काही असेल, असे वाटत नाही. आरोग्य आणि शिक्षणात गुंतवणूक वाढल्याशिवाय देशाचे उत्पन्न वाढू शकणार नाही, असे मुणगेकर म्हणाले. भोला वांजळे यांनी आभार मानले.

===

कृषी मूल्य आयोग १९६५ साली अस्तित्वात आला. तेव्हाच शेतकऱ्यांना हमीभाव देणे आवश्यक होते. हा कायदा झालेला नसला तरी ६५ सालापासून आजवर किमान हमीभाव दिलेला आहे. सरकारने किमान आधारभूत किंमत ठरवून शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. अन्यथा चुकीच्या धोरणांमुळे शेती व्यवसाय उद्ध्वस्त होईल. केंद्राकडून दीड वर्षे कायद्याला स्थगिती दिली जाण्याचे आश्वासन म्हणजे फसवणूक आहे.

===

मध्यमवर्गीयांचा तिरंग्याशी संबंध काय?

लाल किल्ल्यावर दीप सिध्दू नावाच्या व्यक्तीने तिरंग्याचा अपमान केला, असा मध्यमवर्गीयांकडून आरडाओरडा केला जात आहे. मध्यमवर्गीयांचा तिरंग्याशी संबंध काय? देशातील पहिल्या निवडणुकीवेळी गोरगरीब-उघड्यानागड्या-उपेक्षित लोकांनी मतदान करीत लोकशाही जिवंत ठेवली. मध्यमवर्ग निवडणुकांच्या सुट्या जोडून घेऊन फिरायला जातो. शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी हा धुडगुस घडवून आणला आहे. केंद्राने तत्काळ हे कायदे मागे घ्यावेत.

- डॉ. भालचंद्र मुणगेकर