VIDEO | भाजपच्या विनायक आंबेकरांची शरद पवारांवर फेसबूक पोस्ट; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 18:53 IST2022-05-14T17:58:06+5:302022-05-14T18:53:24+5:30

आंबेकरांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

bjp Vinayak Ambekars controversial Facebook post on Sharad Pawar Beating by NCP workers | VIDEO | भाजपच्या विनायक आंबेकरांची शरद पवारांवर फेसबूक पोस्ट; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

VIDEO | भाजपच्या विनायक आंबेकरांची शरद पवारांवर फेसबूक पोस्ट; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे : भाजपचे पुणे शहरातील पदाधिकारी विनायक आंबेकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. ही घटना आज ( १४ मे) दुपारी घडली. दोन दिवसांआधी फेसबुकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांवर आंबेकर यांनी पोस्ट केली होती. या वादग्रस्त पोस्टमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून आज शहरात आंबेकर यांना मारहाण झाली.

आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंबेकर यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना मारहाण केली आहे. विनायक आंबेकर यांच्या विरोधात दोन दिवसआधीच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली होती. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर अवमानकारक पोस्ट केल्याने ही मारहाण करण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

शरद पवारांवरील विनायक आंबेकरांची फेसबूक पोस्ट
शरद पवारांवरील विनायक आंबेकरांची फेसबूक पोस्ट

काल अभिनेत्री केतकी चितळेने शरद पवारांवर फेसबूकवर पोस्ट केली होती. त्यानंतर आज ठाणे पोलिसांनी केतकीला ताब्यात घेतले आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे अनेक ठिकाणी तेढ निर्माण होताना दिसत आहे. 

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर भाजपने या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

मारहाणीनंतर काय म्हणाले विनायक आंबेकर-

मारहाणीत राष्ट्रवादी नेते अंकुश काकडेंचा हात असल्याचा आरोप विनायक आंबेकर यांनी केला आहे. मारहाणीची तक्रार मी पोलिसांत दिली असल्याचे आंबेकर यांनी सांगितले.

Web Title: bjp Vinayak Ambekars controversial Facebook post on Sharad Pawar Beating by NCP workers