कायदा हातात घेऊ नये, स्टंट करणे जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट- राम शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 14:35 IST2022-11-12T14:24:59+5:302022-11-12T14:35:11+5:30
बारामती येथील भाजप कार्यालयात शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला...

कायदा हातात घेऊ नये, स्टंट करणे जितेंद्र आव्हाडांच्या अंगलट- राम शिंदे
बारामती (पुणे) : आपल्या देशात कायदा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने सेंन्सॉर बोर्डाने 'हर हर महादेव' या चित्रपटाला मान्यता दिली आहे. चित्रपटाला मान्यता असताना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना मारहाण करणे, कोणत्या कायद्यात बसते, असा सवाल आमदार राम शिंदे यांनी केला आहे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्या समवेत शिंदे बारामती दौऱ्यावर पोहचले. यावेळी बारामती येथील भाजप कार्यालयात शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिंदे म्हणाले, अशी मारहाण होत असेल तर संबंधितांवर कारवाई होऊन अटक होणारच. जितेंद्र आव्हाडांचा हा स्टंट त्यांच्या अंगलट आला आहे, अशा शब्दात आमदार राम शिंदे यांनी आव्हाड यांच्या अटकेचे समर्थन केले.
आमदार असो वा माजी मंत्री, कोणाच्याही सार्वभौमत्वावर गदा आणण्याचा व कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे शिंदे म्हणाले.