महापालिकेची ‘तिजोरी’स्वच्छ करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 20:22 IST2019-03-08T20:19:49+5:302019-03-08T20:22:08+5:30
क्या हुआ तेरा वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा... वादेने तेरे मारा गया बंदा ये सिधासाधा, सबको सन्मती दे भगवान अशी सत्ताधारी भाजपाला उद्देशून उपरोधिक गाणी बँडवर वाजविण्यात आली.

महापालिकेची ‘तिजोरी’स्वच्छ करण्याकडे सत्ताधाऱ्यांचा कल
पुणे : क्या हुआ तेरा वादा, भोली सुरत दिल के खोटे, वादा तेरा वादा... वादेने तेरे मारा गया बंदा ये सिधासाधा, सबको सन्मती दे भगवान अशी सत्ताधारी भाजपाला उद्देशून उपरोधिक गाणी बँडवर वाजविण्यात आली. महापालिकेमध्ये भ्रष्टाचाराची मालिका सुरु आहे. स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रामाणिकपणे काम करण्याऐवजी पालिकेचे पदाधिकारी नातेवाईकांना पुढे करुन पालिकेची तिजोरी स्वच्छ करीत असल्याचे चित्र असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने पालिकेत बँड वाजवून आंदोलन करण्यात आले.
सर्वसामान्य करदात्या थकबाकीदारांच्या घरापुढे बँड वाजविणाऱ्या पालिकेच्या पुढ्यात बँड वाजवित आंदोलन करण्यात आले. महापालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणातील मानांकन गेल्या वर्षी घसरुन 13 व्या स्थानी गेले होते. यावर्षी ते 37 व्या स्थानापर्यंत घसरले आहे. या घसरगुंडीबाबत सत्ताधारी देत असलेल्या सबबी लंगड्या आणि फसव्या आहेत. ही पुणेकरांची फसवणूक आहे. पुणे स्मार्ट करु असे म्हणत म्हणत शहराची वाट लावण्याचे काम सुरु आहे. याला शहर आणि राज्यातील सत्ता, भाजपा-सेना युती कारणीभूत असल्याचा आरोप शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केला.
कर भरायला एखादा नागरिक चुकला तर त्याच्या घरापुढे बँड वाजविण्यात येतो. मग सत्ताधाऱ्यांनी पुणेकरांची चालवलेली फसवणूक म्हणून राष्ट्रवादीने बँड वाजवित आंदोलन केल्याचे तुपे म्हणाले. शेकडो कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या मोबाईल कंपन्यांना कामाची आणि खोदाईची परवानगी कशी दिली जाते असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पुणे शहर च्या वतीने आज शहराध्यक्ष चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेच्या खालावलेल्या कारभारावर व दर्जाहीन तेवर आज महानगरपालिकेच्या दारात बँड वाजून आंदोलन करण्यात आलं
या आंदोलनात रवींद्र माळवदकर, राकेश कामठे, विजय डाखले, संतोष नांगरे, विपुल म्हैसूरकर, बाळासाहेब बोडके, प्रदीप देशमुख, शिल्पा भोसले, मनोज पाचपुते, गणेश नलावडे, स्वप्निल दुधाने, नितीन कदम, विनायक हनमघर, फहीम शेख, शांतीलाल मिसाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते