Pooja Chavan Case: "मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाइल, लॅपटॉपचं माहित नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 03:47 PM2021-03-04T15:47:52+5:302021-03-04T15:48:10+5:30

Pooja Chavan case: - BJP corporator dhanraj ghogare denies allegations about pooja chavan laptop and mobile: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

bjp corporator dhanraj ghogare denies allegations about pooja chavan laptop and mobile | Pooja Chavan Case: "मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाइल, लॅपटॉपचं माहित नाही"

Pooja Chavan Case: "मी पूजाला फक्त उचलून रिक्षात ठेवलं; मोबाइल, लॅपटॉपचं माहित नाही"

googlenewsNext

Pooja Chavan case - पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात घटनास्थळी उपस्थित असणारे भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. "पूजा चव्हाणचा कोणताही लॅपटॉप किंवा मोबाइल माझ्याकडे नाही. त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही", असं स्पष्टीकरण धनराज घोगरे Dhanraj Ghogare यांनी दिलं आहे. 

५७४ किमी अंतर कसे पार केले? त्या प्रवासामुळे पूजा चव्हाण प्रकरणाचे गुढ वाढले

पुण्याच्या वानवडी येथे पूजा चव्हाणच्या जेव्हा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला त्यावेळी भाजप नगरसेवक धनराज घोगरे घटनास्थळावर उपस्थित होते. त्यावेळी घोगरे यांनी पूजा चव्हाणचा लॅपटॉप आणि मोबाइल आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. घोगरे यांनी आज थेट पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील आपली भूमिका स्पष्ट केली. 

पोलिसांना पहिला फोन मीच केला- धनराज घोगरे
"वानवडी परिसरात इमारतीवरुन उडी घेऊन तरुणीनं आत्महत्या केल्याचं मला कळालं तसं मी तातडीनं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो होतो. तिला उचलून मी फक्त रिक्षात ठेवलं आणि पोलिसांना पहिला फोन मीच केला. मोबाइल आणि लॅपटॉपचं मला माहित नाही. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन सर्व गोष्टी ताब्यात घेतल्या", असं धनराज घोगरे म्हणाले. 

Exclusive : पूजा चव्हाण प्रकरणी हाती महत्वाचे धागेदोरे; भाजप जाणार हायकोर्टात

"जिथं ही घटना घडली ते ठिकाण माझ्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून तिथं पोहोचलो. तिचं नाव पूजा आहे हे देखील मला माहित नव्हतं. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेणं हे माझं प्राथमिक काम होतं", असं धनराज घोगरे यांनी सांगितलं.  

'२-३ दिवसांत माझी हत्या होण्याची शक्यता'; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आता वेगळ्याच वळणावर!

पूजा चव्हाण हिचा लॅपटॉप धनराज घोगरे यांनी चोरल्याचा आरोप बीडच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या नेत्या संगीता चव्हाण यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी धनराज घोगरे आणि भाजप नेत्या चित्रा वाघ  Chitra Wagh यांच्याविरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळंच वळण प्राप्त झालं आहे.   
 

Web Title: bjp corporator dhanraj ghogare denies allegations about pooja chavan laptop and mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.