शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी’च्या सर्व परीक्षांना बायोमेट्रिक हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 19:04 IST

यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देयापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवातबोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची अनेक विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया

पुणे : बोगस विद्यार्थ्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग(एमपीएससी) आता मुख्य परीक्षांसह सर्व पुर्व परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. यापुर्वी तीन-चार मुख्य परीक्षांना ही पध्दत वापरण्यात आली. तर रविवारी (दि. २३) पहिल्यांदाच आयोगाने महिला व बाल विकास विभागाच्या गट ब पदाच्या पुर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेतली. यापुढील पुर्व परीक्षांसाठीही आता ही पध्दत अवलंबण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या विविध विभागातील भरतीसाठी आयोगामार्फत परीक्षा घेतल्या जातात. थेट भरती, स्पर्धात्मक परीक्षा, विभागीय परीक्षा, मर्यादीत परीक्षा घेतल्या जातात. प्रामुख्याने थेट भरती व स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात असते. स्पर्धात्मक परीक्षा या साधारणपणे पुर्व, मुख्य व मुलाखत या स्वरूपाच्या असतात. तर थेट भरती परीक्षांमध्ये पुर्व व मुलाखत अशी प्रक्रिया असते. पुर्व परीक्षेच्या तुलनेत मुख्य परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या खुप कमी असते. त्यामुळे आयोगाने सुरूवातीला मुख्य परीक्षांसाठी बायोमेट्रिक हजेरी घेण्यास सुरूवात केली. मागील काही महिन्यांत झालेल्या तीन ते चार परीक्षांसाठी ही हजेरी घेण्यात आली. पण पुर्व परीक्षेसाठी आतापर्यंत बायोमेट्रिकचा वापर करण्यात आला नव्हता. आयोगाकडे सर्व विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक आहेत. त्याआधारे विद्यार्थ्यांची ओळख पटविणे शक्य होणार आहे.रविवारी (दि. २३) आयोगामार्फत निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, अधिक्षक, अधिव्याख्याता, सांख्यिकी अधिकारी गट ब या पदांसाठी पुर्व परीक्षा घेतली. या परीक्षेसाठी सर्व केंद्रांवर बायोमट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली होती. एखाद्या पुर्व परीक्षेसाठी पहिल्यांदाच अशी चाचपणी करण्यात आली. परीक्षा कक्षामध्ये जाण्यापुर्वीच विद्यार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा आणि छायाचित्र घेण्यात आले. या प्रक्रियेनंतर ओळखपत्राच्या झेरॉक्सवर हॉलमार्क लावण्यात आले. त्यानंतरही परीक्षा कक्षात प्रवेश दिला जात होता. तसेच परीक्षेवेळीही छापील छायाचित्रासमोर अंगठ्याचा ठसा घेतला गेला. बहुतेक विद्यार्थ्यांसाठी हे नवीन होते. पण बोगस विद्यार्थी टाळण्यासाठी ही प्रक्रिया योग्य असल्याची प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीEducationशिक्षणGovernmentसरकार