पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 12:24 IST2024-07-04T12:23:50+5:302024-07-04T12:24:45+5:30

पत्नीला सोडून घरी परत येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये प्रदीप गंभीर जखमी होऊन मयत झाला....

Bike rider killed in collision with vehicle while leaving wife for work, accident in Pune | पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात

पत्नीला कामावर सोडून जाताना वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पुण्यातील अपघात

पिंपरी : पत्नीला कामावर सोडून घरी परत येत असलेल्या व्यक्तीच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. माण येथील जोशी वडेवाले दुकानासमोर मंगळवारी (दि. २) सकाळी साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडला.

प्रदीप तुळशीदास मोरे (३८, रा. माण गाव, ता. मुळशी. मूळ रा. परभणी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तेजसकुमार रमाकांत जाधव (३०, रा. तळेगाव दाभाडे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव यांच्या आत्याचा मुलगा प्रदीप मोरे मंगळवारी सकाळी त्याच्या पत्नीला कामावर सोडण्यासाठी गेला. पत्नीला सोडून घरी परत येत असताना त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यामध्ये प्रदीप गंभीर जखमी होऊन मयत झाला.

Web Title: Bike rider killed in collision with vehicle while leaving wife for work, accident in Pune