नगर - कल्याण महामार्गावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 15:16 IST2022-08-26T15:16:32+5:302022-08-26T15:16:43+5:30
अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकी १०० मीटर अंतरावर फरफटत नेली

नगर - कल्याण महामार्गावर एसटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
उदापूर : डिंगोरे ता.जुन्नर गावच्या हद्दीत नगर कल्याण महामार्गावर हा अपघात गुरूवारी रात्री आठ वाजता झाला असून यात नितीन विलास मेहेत्रे (वय.२५ रा.डिंगोरे) हा दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की बसने दुचाकी १०० मीटर अंतरावर फरफटत नेली होती.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार, नितीन हा बनकर फाट्यावरून डिंगोरे गावाकडे नगर कल्याण महामार्गावरून कामानिमीत्त दुचाकीने जात होता. समोरून आलेल्या कल्याण-नगर एस टी बस ची जोरदार धडक दुचाकीला बसली. या अपघाता नितीनचा जागीच मृत्य झाला. रात्री उशिरा या तरुणाचा पंचनामा करून शवविच्छेदन केल्यानंतर शुक्रवारी सकाळी १० वा डिंगोरे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पुढील तपास ओतूर सहायक पोलीस निरीक्षक परशूराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी बाळशीराम भवारी करीत आहे.