Pune: अहमदनगर - पुणे रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
By नितीश गोवंडे | Updated: December 13, 2023 17:47 IST2023-12-13T17:46:26+5:302023-12-13T17:47:24+5:30
लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

Pune: अहमदनगर - पुणे रस्त्यावर भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे : अहमदनगर - पुणे रस्त्यावरील वाघोली परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला धडक देऊन स्वप्निल कांतीलाल सोनवणे (२६) या तरुणास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालकाविरोधात (एमएच १२ के ९५९९) लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी गणेश लक्ष्मण आरे (रा. वाघोली) यांनी आरोपी विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
स्वप्निल सोनवणे हा गणेश आरे यांच्याकडे काम करण्यास होता. घरातून तो मोटरसायकल घेऊन कामावर येत असताना, वाघोली बकोरी फाटा याठिकाणी त्याच्या पाठीमागून एक ट्रेलर ट्रक वेगात आला. संबंधित ट्रकवरील चालक आणि त्याच्या ताब्यातील ट्रेलर हा वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत भरधाव वेगाने येऊन सोनवणे यास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. संबंधित ट्रक चालकाचा पोलिस शोध घेत आहेत.