भरधाव वाहनाच्या धडकेने नगर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू ; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 12:25 IST2024-01-16T12:20:51+5:302024-01-16T12:25:02+5:30

वाहनचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...

Bike rider dies after being hit by a speeding vehicle on city road; Offense against motorist | भरधाव वाहनाच्या धडकेने नगर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू ; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

भरधाव वाहनाच्या धडकेने नगर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू ; वाहनचालकाविरुद्ध गुन्हा

पुणे : भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्ता भागात घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्ञानेश्वर हरिभाऊ थोरत (रा. केसनंद-वाघोली रस्ता, ता. हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत थोरत यांचा मुलगा रोहन (वय २१) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार ज्ञानेश्वर थोरत केसनंद-थेऊर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार थोरत यांना धडक दिली. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला. पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार देवकर तपास करत आहेत.

Web Title: Bike rider dies after being hit by a speeding vehicle on city road; Offense against motorist