कात्रज नवले पुल रस्त्यावर दुचाकीचा अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2022 13:22 IST2022-10-17T13:21:59+5:302022-10-17T13:22:13+5:30
पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार

कात्रज नवले पुल रस्त्यावर दुचाकीचा अपघात; ट्रकच्या चाकाखाली येऊन महिलेचा जागीच मृत्यू
कात्रज: नवले ब्रिज कडून सकाळच्या सुमारास पती व पत्नी दुचाकी ज्युपिटर वरून कात्रजच्या दिशेने जाताना ट्रकच्या चाकाखाली येऊन मागे बसलेल्या वैशाली कांबळे वय ३९ रां.धायरी यांचा जागेवर मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कांबळे यांचा मृतदेह पुढील तपसासाठी ससून येथे पाठवण्यात आला असून पती हे जखमी असल्याने भारती विद्यापीठ दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांनी दिली.
सदरील घटना अशोक लीलांड शोरूम च्या समोरील रस्त्यावर घडली. नवले पुल ते कात्रज चौक रस्त्यावर रस्त्याचे काम चालू असल्याने वाहतूक कोंडी होत असते त्याचबरोबर या रस्त्यावर खड्ड्यांचे देखील प्रमाण जास्त आहे . खराब रस्त्यामुळेच अपघात होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची खंत एका प्रत्यक्ष दर्शने व्यक्त केली.