SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

By प्रशांत बिडवे | Updated: June 1, 2023 13:52 IST2023-06-01T13:39:14+5:302023-06-01T13:52:09+5:30

मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल

Big news Finally the wait is over the 10th result will be announced on June 2 | SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

SSC Result: मोठी बातमी! अखेर प्रतीक्षा संपली, दहावीचा निकाल २ जूनला जाहीर हाेणार

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमाइक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवार दि २ जून रोजी ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर  दुपारी १ वाजल्यानंतर जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. 

विद्यार्थ्यांना १. www.mahresult.nic.in २. http://sscresult.mkcl.org ३. https://ssc.mahresults.org.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. मार्च २०२३ परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना विषय निहाय मिळालेले गुण या संकेतस्थळांवरुन पाहता येतील तसेच गुणांची प्रिंट आउट घेता येईल.

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. दहावीच्या परीक्षेला राज्यातून १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी बसले होते. त्यात ८ लाख ४४ हजार ११६ मुले आणि ७ हजार ३३ हजार ०६७ मुलींचा समावेश होता.राज्यभरातील ५ हजार ३३ केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

Web Title: Big news Finally the wait is over the 10th result will be announced on June 2