शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राडा : पाणी प्रश्नावर नगरसेवक हंडा-कळशीसह सभागृहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 16:03 IST

शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे-कलशा घेवून महापालिकेत आले.

ठळक मुद्देनगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच मांडला ठाण पाटबंधारे विभागाने महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत केले बंद

पुणे : गेल्या आठवड्यापासून अपेक्षेप्रमाणे पुणे शहरात गाजणाऱ्या पाणीप्रश्नावरुन महापालिकेत गदारोळ करण्यात आला आहे. शहरातील सर्व भागात विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे संतप्त झालेले भाजप वगळता इतर पक्षांचे नगरसेवक हंडे-कलशा घेवून महापालिकेत आले.यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कलशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडत मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील केली.      याबाबत अधिक माहिती अशी की, कालवा समितीच्या बैठकीत पुणे महापालिकेला देण्यात आलेल्या दररोजच्या पाण्याचे प्रमाण वाढत्या शहरीकरणामुळे पुरेसे नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून महापालिका दिलेल्या प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलते.यंदा प्रथमच पाटबंधारे विभागाने या प्रकाराला चाप लावत चक्क महापालिकेच्या पाण्याचे पंप पोलिसांच्या उपस्थितीत बंद केले. अर्थात महापालिकेला या प्रकारची कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याने ऐन नवरात्रीत शहराच्या पूर्व भागाचा पाणीपुरवठा खंडित झाला होता.याच विषयावर मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसेने आंदोलन केले. यावेळी नगरसेवकांनी थेट हंडे-कळशा घेत महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच ठाण मांडला.या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करण्यात आली. विरोधी पक्षनेते चेतन तुपे, काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे, शिवसेना गटनेते संजय भोसले यांच्यासह नगरसेवक सहभागी झाल्याचे बघायला मिळाले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसWaterपाणी