खाकी वर्दीचं मोठं मन; सामाजिक बांधिलकी जपत केलं रक्तदान शिबिराचं आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 06:38 PM2021-01-23T18:38:55+5:302021-01-23T18:39:06+5:30

भविष्यात जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडेल, तेव्हा तेव्हा पोलीस बांधव रक्तदानासाठी पुढाकार घेतील...

Big heart of Pune Police ; Organized blood donation camp keeping social commitment | खाकी वर्दीचं मोठं मन; सामाजिक बांधिलकी जपत केलं रक्तदान शिबिराचं आयोजन

खाकी वर्दीचं मोठं मन; सामाजिक बांधिलकी जपत केलं रक्तदान शिबिराचं आयोजन

Next
ठळक मुद्देपोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता : वाहतूक शाखेतर्फे रक्तदान शिबीर

पुणे : अपघातात दररोज रक्त पाहताना, पोलिसांना वाईट वाटते, पण जेव्हा रक्ताची गरज असल्याचे समजते, तेव्हा हेच पोलीस समाजातील घटक म्हणून सामाजिक बांधिलकी मानून रक्तदानासाठी पुढे आले आहेत. भविष्यातही जेव्हा काही गरज भासेल, तेव्हा पोलीस पुढाकार घेतील, असे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले. 

वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभिनायाअंतर्गत शिवाजीनगर येथील पोलीस हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी पोलीस आयुक्त गुप्ता यांनी स्वत: रक्तदान करुन पोलिसांना रक्तदानाचे आवाहन केले.

पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, रस्त्यावरील अपघात, घटनांमध्ये पोलीस नेहमीच रक्त पाहत असतात. ससून रुग्णालयात जेव्हा रक्ताची कमतरता आहे, असे समजल्यावर अपघात रोखण्यासाठी जनजागृती करण्याबरोबर या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भविष्यात जेव्हा जेव्हा समाजाला गरज पडेल, तेव्हा पोलीस बांधव नेहमीच पुढाकार घेतील. यावेळी सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह अनेक पोलीस अधिकार्‍यांनी रक्तदान केले. 

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, रस्ता सुरक्षा अभियानात अपघात कमी व्हावेत, यासाठी पोलीस जनजागृती करीत आहेत.  कोणतीही घटना घडल्यावर तेथे पोलीस सर्वप्रथम पोहचतात. जखमींना रुग्णालयात दाखल करतात. केवळ जनजागृती नाही तर प्रत्यक्ष सहभाग म्हणून यंदा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जवळपास १२० रक्तबाटल्या गोळ्या करण्यात आल्या. 

 

Web Title: Big heart of Pune Police ; Organized blood donation camp keeping social commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.