शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भुशी धरण ‘ओव्हर फ्लो’

By admin | Updated: July 17, 2014 03:25 IST

मागील ४८ तासांपासून लोणावळा शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण सकाळी ९ वाजता शंभर टक्के भरून वाहू लागले

लोणावळा : मागील ४८ तासांपासून लोणावळा शहर व परिसरात जोरदार पाऊस झाला. पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण सकाळी ९ वाजता शंभर टक्के भरून वाहू लागले. दुपारी १.३० वाजल्यापासून धरणाच्या सांडव्यावरून व सत्यम, शिवम, सुंदरम रुपी पायऱ्यांवरुन पाणी वाहू लागल्याने धरण भागात आज फिरायला आलेल्या पर्यटकांनी मनसोक्त वर्षाविहाराचा आनंद लुटला. मागील वर्षी १६ जूनला धरण भरले होते. तुलनेने यावर्षी पावसाने मोठी उघडीप दिल्याने धरण तब्बल एक महिना उशिराने भरले आहे.मागील काही वर्षांपासून लोणावळा पाऊस व पर्यटन हे एक समीकरण झाले आहे. यावर्षी पावसाने दीड महिना दडी मारल्याने धरण भरण्यास उशीर झाला होता. तरी मागील महिनाभरापासून पर्यटक धरण भरण्याची चातकाप्रमाणे वाट पहात होते़ पावसाने मागील आठवडा भरापासून शहरात कमी अधिक पावसाचा लपंडाव खेळत मागील दोन दिवसांपासून शहरात चांगली हजेरी लावली. दोन दिवसांपूर्वी केवळ ३० टक्के असलेले भुशी धरण बुधवारी सकाळी ९ वाजता शंभर टक्के भरले़ मागील २४ तासांत शहरात ९५ मिमी पावसाची नोंद झाली असून, बुधवारी सकाळी ८ ते सायंकाळी ५ दरम्यान तब्बल ११८ मिमी एवढा पाऊस झाला आहे़ शहरात आतापर्यंत ६८३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सरासरी वाढण्याची शक्यता आहे़ मागील वर्षी जूनअखेरपर्यंत २३१७ मिमी ऐवढा पाऊस झाला होता़ जोरदार पावसामुळे शहरातील बहुतांश सर्व लहान धरणे भरली असून, सहारा पूल धबधबा, लायन्स पॉइंट येथील गिधाड तलाव धबधबा, नाझर ओढा, आयएनएस शिवाजी जवळील डोंगरामधून वाहणारा धबधबा, खंडाळा शूटिंग पॉइंट येथील धबधबा, तसेच दुधिवरे खिंडीमधील धबधबे, तुंगार्ली भागातील धबधबे वाहू लागले आहेत़ त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी होती़ (वार्ताहर)